शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोपीचंद पडळकरांच्या भावजय जि. प. सदस्य माधवी पडळकर यांच्या निवडीला आव्हान, शिंदेसेनेच्या विद्या मोटे यांची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:03 IST

राज्यातील पहिलीच घटना

विटा : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजय व आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या भाजपच्या नूतन जिल्हा परिषद सदस्या माधवी ब्रह्मानंद पडळकर यांच्या निवडीला विटा न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिंदेसेनेच्या पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी गुरुवारी विटा न्यायालयात याचिका दाखल केल्याने राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे.निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या माधवी पडळकर विरुद्ध शिंदेसेनेच्या विद्या मोटे यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या माधवी पडळकर यांचा ९८० मतांनी विजय झाला. परंतु, हा विजय लोकशाही मार्गाने नव्हे तर हुकूमशाही, दमदाटी व दहशतीने झाल्याचे सांगत शिवसेनेच्या पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी गुरुवारी विटा न्यायालयात राज्य निवडणूक आयोग व माधवी पडळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली. यानंतर विद्या मोटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्या म्हणाल्या, निंबवडे जिल्हा परिषद गटात निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात दहशत माजविण्यात आला. मतदारांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना मारहाण करण्यात आली. प्रचाराच्या गाड्या फोडण्यात आल्या. त्यामुळे ही निवडणूक लोकशाही मार्गाने झाली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवेळी घडलेल्या घटनांचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. ते पुरावे घेऊन मी विटा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भाजपच्या माधवी पडळकर यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले असून, आम्ही वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली नसल्याने राज्य निवडणूक आयोगालाही या याचिकेत समाविष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gopichand Padalkar's Sister-in-Law's Election Challenged; Shinde Sena Files Petition

Web Summary : Madhavi Padalkar's election as Zilla Parishad member is challenged in Vita court by Shinde Sena's Vidya Mote, alleging coercion and electoral malpractice during the Nimbavade election. Mote claims voter intimidation and demands investigation.