शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जतमध्ये पाण्यासाठी महिन्यात गोड बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजत : जत तालुक्याच्या पूर्व भागाला कर्नाटकातून पाणी मिळावे, यासाठी महाराष्टÑ शासन सतत प्रयत्नशील आहे. कर्नाटकाला साडेचार टीएमसी पाणी सोडून त्याच्या बदल्यात जत तालुक्याला पाणी मिळावे, यासंदर्भात प्राथमिक चर्चा शासनस्तरावर झाली आहे. परंतु त्यास अंतिम स्वरूप प्राप्त झाले नाही. येत्या एक महिन्यात त्यासंदर्भात गोड बातमी आपल्यापर्यंत येईल, अशी ...

ठळक मुद्दे गिरीश महाजन : अंकलेत ‘म्हैसाळ’च्या कामास प्रारंभशासन स्तरावर पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेऊशेतीचा विकास व पाणी पुरवठा योजना यासाठी जास्तीत जास्त निधी खर्च केला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कजत : जत तालुक्याच्या पूर्व भागाला कर्नाटकातून पाणी मिळावे, यासाठी महाराष्टÑ शासन सतत प्रयत्नशील आहे. कर्नाटकाला साडेचार टीएमसी पाणी सोडून त्याच्या बदल्यात जत तालुक्याला पाणी मिळावे, यासंदर्भात प्राथमिक चर्चा शासनस्तरावर झाली आहे. परंतु त्यास अंतिम स्वरूप प्राप्त झाले नाही. येत्या एक महिन्यात त्यासंदर्भात गोड बातमी आपल्यापर्यंत येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अंकले (ता. जत) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प म्हैसाळ योजनेच्या जत भागातील पंपगृह व उर्ध्वगामी नलिका टप्पा क्रमांक ६ (अ) च्या अंकले (ता. जत) येथील कामाचा प्रारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात येणार होता. परंतु ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा नियोजित कार्यक्रम रद्द करून रात्री उशिरा अंकले येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात येत्या दीड महिन्यात अनुकूल असा निर्णय होईल, असे सांगून मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेचे अपूर्ण काम येत्या एका वर्षात पूर्ण होणार आहे. शेतीचा विकास व पाणी पुरवठा योजना यासाठी जास्तीत जास्त निधी खर्च केला जाणार आहे. निधी उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीच अडचण निर्माण होणार नाही.वाळेखिंडी, नवाळवाडी, बेवनूर, बागलवाडी या चार गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव व अ‍ॅड. प्रभाकर जाधव यांनी मागणी केली. शासन स्तरावर पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आ. विलासराव जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खा. संजयकाका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आ. सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, रमेश शेंडगे, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, मुख्य अभियंता टी. एन. मुंढे, कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, जत पंचायत समितीच्या सभापती मंगल जमदाडे, जि. प. शिक्षण समिती सभापती तम्मणगौडा रवी-पाटील व श्रीदेवी जावीर, रामाण्णा जिवन्नावर, संजय सावंत, प्रकाश जमदाडे, सरदार पाटील, प्रमोद सावंत, शिवाजीराव ताड, महादेव पाटील, कुंडलिक दुधाळ, शिवाप्पा तावशी, उमेश सावंत, सुनील पवार उपस्थित होते. भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी यांनी आभार मानले.