शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पाच कोटींच्या विकासकामात गोलमाल

By admin | Updated: November 13, 2014 23:50 IST

दिग्विजय सूर्यवंशी : सत्ताधारी, प्रशासनाकडून लुटीचा उद्योग

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व प्रशासनाने संगनमताने शासकीय निधीच्या लुटीचा उद्योग सुरू केला आहे. आॅगस्ट महिन्यात स्थायी समिती सभेत सुमारे पाच कोटींची कामे ऐनवेळच्या विषयात मंजूर करण्यात आली आहेत. या कामांची निकड न तपासताच आयुक्तांनीही त्यांना मंजुरी दिली असून, त्यामुळे या कामात गोलमाल झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठकीत केला. प्रशासनाने या कामांच्या ई-टेंडर पद्धतीने निविदा काढाव्यात, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, शासकीय निधी, तेरावा वित्त आयोग व इतर निधीतील पाच कोटींची कामे सत्ताधाऱ्यांनी कलम ५:२:२ खाली मंजूर केली. स्थायी समितीने आॅगस्ट महिन्यात हा प्रताप केला. वास्तविक कायद्यानुसार अत्यावश्यक कामेच या कलमाखाली मंजूर करता येतात. पण सत्ताधाऱ्यांनी गटारी, रस्ते, चरी बुजविणे अशी कामे मंजूर केली. इस्लामपूर रस्त्यावरील रस्ता दुभाजकात झाडे लावण्याच्या विषयालाही मान्यता दिली. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. त्यावर महापालिकेने अनावश्यक पैसा खर्च केला. महापालिकेकडे दोनशे ठेकेदार असताना, सत्ताधाऱ्यांनी बगलबच्च्या ठेकेदारांनाच कामांचे वाटप केले आहे, असे सांगत त्यांनी ठेकेदारांची यादीच जाहीर केली. आयुक्तांकडे फेरप्रस्ताव सादर झाल्यानंतर त्यांनी तरी ही कामे रोखण्याची गरज होती. जाहीर निविदा काढून कामांचे वाटप झाले असते, तर त्यातून पालिकेचा फायदा झाला असता. पण आयुक्तांनीही त्याकडे डोळेझाक केली आहे. ही कामे निविदा पद्धतीने द्यावीत, अन्यथा न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत, राज्य शासनाकडेही तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.कामाच्या दर्जावर नियंत्रण नाहीसध्या साठ कोटींची कामे सुरू झाली आहेत. या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. त्यावर कोणत्याही अधिकाऱ्याचे नियंत्रण नाही. स्थायीच्या ठरावावर राष्ट्रवादीच्या सदस्यांच्याही सह्या आहेत. पण त्यांनी हे ठराव रद्द करण्याचे पत्र आयुक्तांना दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. पाच कोटींच्या कामांतील ठरावावर बाळू गोंधळी यांच्या सर्वाधिक १९, तर राष्ट्रवादीचे सुनील कलकुटगी यांच्या १४ ठरावांवर सह्या आहेत.