शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

सोने दरात घसरण, उलाढाल वीस टक्क्यांनी वाढली

By admin | Updated: November 5, 2014 23:31 IST

सांगली बाजारपेठ : आगामी दराबाबत संभ्रमावस्था, सोनेतारण व्यवहारावरही झाला मोठा परिणाम

अंजर अथणीकर - सांगली -सोने-चांदी दरामध्ये गेल्या आठवड्याभरात झालेल्या घसरणीमुळे येथील सराफ बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या विक्रीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. आगामी दराबाबत मात्र संभ्रमावस्था असून, तारण व्यवहारावरही परिणाम झाला आहे. सोन्याचा आजचा दर २५ हजार ९०० रुपये दहा ग्रॅम, तर चांदीचा दर ३६ हजार रुपये किलो होता. गेल्या आठ दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु आहे. दिवाळीपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु झाली आहे. दिवाळीमध्ये सोन्याचा दर २७ हजार १००, तर चांदीचा दर ३९ हजार ४०० रुपये होता. दरातील घसरणीला आंतरराष्ट्रीय कारण असल्याचे सराफांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी सोन्याचा दर २५ हजारापर्यंत खाली आला होता. त्यानंतर मात्र दरात वाढच होत गेली. ३२ हजारांपर्यंत सोन्याने मजल मारली होती. त्यानंतर सर्वाधिक काळ तीस हजारापर्यंत दर राहिला होता. बुधवारचा २५ हजार ९00 हा दर दोन वर्षातील सर्वात निच्चांकी दर आहे. चांदीचा दरही दोन वर्षात पहिल्यांदाच इतका खाली आला आहे. सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे सराफ बाजारामध्ये उलाढाल मात्र वाढली आहे. सोन्याच्या खरेदीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रोजची ४० ते ५० लाखांची उलाढाल वाढली आहे. काही ग्राहक अद्याप दर उतरतील, म्हणून ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहेत. गहाणवट व्यवहारावरही परिणाम सोन्याच्या गहाणवट व्यवहारावरही दरातील घसरणीचा परिणाम झाला आहे. यापूर्वी तीस हजार रुपये असणारा दर आता २६ हजाराच्या घरात आल्याने बँका, आर्थिक संस्था, परवानाधारक सावकार यांना अडचण निर्माण झाली आहे. सोन्याच्या दराच्या ८० टक्के कर्ज वाटप करण्यात येते. आता दर उतरल्याने सोन्यावर अधिक कर्ज वाटप झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जदारांना संस्था चालकांकडून सूचना देण्यात येत आहेत.तीन महिन्यातील दर दिनांकसोने चांदी १ आॅगस्ट२८,१००४५,०००२ सप्टेंबर२८,१२५४२,९००१ आॅक्टोबर२७,१००४०,०००२० आॅक्टोबर२७,६५०३९,४००३१ आॅक्टोबर २६,९८०३८,६००२ नोव्हेंबर२६,५००३७,५००(दर सोने तोळा आणि चांदी किलोत)सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे व्यवसाय सुमारे पंधरा टक्के वाढला आहे. आंतरराष्ट्रीय कारणामुळे ही घसरण आहे. सध्यातरी दर वाढण्याची शक्यता नाही. आगामी दराबाबत काही सांगता येत नाही.- किशोर पंडित, प्रदेश उपाध्यक्ष, सराफ असोसिएशन.