शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात मंत्रालयात जाणार

By admin | Updated: April 12, 2017 22:52 IST

सुगम-दुर्गम : खटाव तालुक्यातील दुर्गम शाळांचा फेरविचार करा; शिक्षक संघाची मागणी

पुसेगाव : विविध निकषांचा विचार करून सुगम व दुर्गम प्राथमिक शाळा निश्चित करताना तसेच त्या शाळांचा दर्जा ठरवताना खटाव तालुक्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून अन्याय झाला आहे. दि. १६ मार्च २०१७ रोजी या तालुक्यातील सुमारे ८० शाळा दुर्गम (अवघड क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या असतानाही केवळ ९ शाळांना अवघड क्षेत्र मानण्यात आले आहे. त्यामुळे या ९ शाळांव्यतिरिक्त अत्यंत दुर्गम शाळांत काम करणाऱ्या शिक्षकांवर बदलीबाबत अन्याय होणार आहे. प्रशासनाने याचा पुर्नविचार न केल्यास या तालुक्यातील पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच प्राथमिक शिक्षक संघ व समितीचे पदाधिकारी या अन्यायाविरोधात मंत्रालयात धाव घेणार आहेत.गावात वाहन जात नाही ते गाव दुर्गम व ज्या गावात वाहन जाते ते गाव सुगम या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील गावे सोमवारी निश्चित करण्यात आली. त्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अंतिम मंजुरी ही दिली. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७१६ शाळांपैकी ५२८ शाळांचा समावेश अवघड क्षेत्र (दुर्गम) तर २ हजार १८८ शाळांचा सुगम क्षेत्रात झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी अध्यादेश काढला असून, सुगम व दुर्गम या दोन वर्गातच बदल्या कराव्यात, असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे सुगम भागात १० वर्षे काम केलेल्यांना दुर्गममध्ये तर ३ वर्षे काम केलेल्यांना सुगम भागात बदली पात्र धरले जाणार आहे. जरी संबंधित गावे निवडण्याचे सर्वाधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असले तरी सुगम, दुर्गम गावांची माहिती प्राथमिक स्तरावर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी येथील शिक्षकांना किंवा संघ व समितीच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता ८० शाळा दुर्गम अवस्थेत असतानाही केवळ ९ शाळांची माहिती जिल्हा परिषदेकडे दिली आहे.वास्तविक, खटाव तालुका हा डोंगरी भागात येतो. शासनाच्या विविध सवलतींसाठी हा तालुका अत्यंत दुष्काळी व दुर्गम असताना शिक्षणाच्याबाबतीतच या भागावर का अन्याय? शासनाने लावलेले दुर्गम भागाचे निकष पूर्ण करतील, अशा कित्येक शाळा या तालुक्यात आजही सुरू आहेत. प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम असणाऱ्या या शाळा आज शासनाच्या या फतव्यामुळे सुगम म्हणून घोषित करण्यात येत आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात या सुगम समजल्या जाणाऱ्या या दुर्गम शाळा केवळ विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडतील. असा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दुर्गम भागात काम करण्याऱ्या शिक्षकाला सुगम भागातील शिक्षक समजून त्याला बदली केल्याने पुन्हा एकदा दुर्गम भागातच कामाला जावे लागणार आहे. त्यामुळे खटाव तालुक्याच्या बाबतीत दुर्गम असणाऱ्या शाळांचा फेर विचार व्हावा, अशी मागणी शिक्षक, पालक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)