शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
7
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
8
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
10
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
11
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
12
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
13
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
14
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
15
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
16
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
17
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
18
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
19
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
20
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांचे देव पाण्यात

By admin | Updated: October 26, 2016 00:10 IST

कवठेमहांकाळ नगरपंचायत : अनुसूचित महिलेसाठी राखीव, राजकीय कें द्रात गटा-तटाचा संघर्ष

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ --पहिल्या नगरपंचायतीचे धुमशान सुरू झाले असून, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. सतरा प्रभागांतून सतरा नगरसेवक या निवडणुकीत निवडून जाणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठीही इच्छुकांनी गर्दी केली आहे. हे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. पहिला नगराध्यक्ष कोण होणार, निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, याची जोरदार चर्चा तालुक्यासह कवठेमहांकाळ शहरात सुरू आहे.कवठेमहांकाळ शहर हे तालुक्याचे राजकीय केंद्र आहे. शहरात सध्या पक्षीय राजकारणाला बगल देत गटा-तटाचे राजकारण जोमात सुरू असून, नगरपंचायतीच्या निवडणुकीतही गटा-तटातच जोरदार संघर्ष होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शहरात आबा गट, विजयराव सगरे गट, काका गट आणि अजितराव घोरपडे गट असे गट आहेत. आबा गटाचे शहरातील नेतृत्व गजानन कोठावळे सांभाळतात. त्यामुळे ही नगरपंचायतीची निवडणूक संघर्षपूर्ण होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुणाची युती कोणाशी होणार, यावर नगरपंचायतीचा निकाल अवलंबून असणार आहे.सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता, आबा गट आणि घोरपडे गटाचे सलोख्याचे राजकीय संबंध आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोण कुणाशी युती करणार, यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. खा संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, अजितराव घोरपडे यांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी ही निवडणूक दिशा देणारी ठरणार असल्याने, हे तिघेही या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावणार, हे स्पष्ट आहे. गतवेळच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सगरे, घोरपडे, काका हे गट एकत्रित आबा गटाच्या विरोधात लढले होते. त्यावेळी कोठावळे यांनी एकाकी जोरदार टक्कर दिली होती. यामध्ये ग्रामपंचायतीवर सगरे, घोरपडे, काका गटाची सत्ता आली होती. सहा महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ सोसायटीची निवडणूक झाली. यामध्ये कोठावळे, घोरपडे, काका आणि शिवसेना यांची युती होती. त्यांनी सगरे गटाला पराभवाचा धक्का दिला होता. माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांचे या निवडणुकीवर विशेष लक्ष असल्याने, त्यांची भूमिका व निर्णय या निवडणुकीत महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनाही दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा लढविण्याचा तयारीत आहे. आरपीआय, बसप हे पक्षही तयारी करत आहेत.ग्रामपंचायत १९५४ मध्ये स्थापन झाली होती. ती १६ मार्च २0१६ ला संपुष्टात येऊन नगरपंचायत अस्तित्वात आली. या नगरपंचायतीमध्ये १७ प्रभाग असून साडेपंधरा हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच या निवडणुकीत युवावर्ग जोमात असणार आहे. एकूणच अद्याप राजकीय समीकरणे स्पष्ट नाहीत. येत्या आठवड्याभरात ही समीकरणे स्पष्ट होणार आहेत. सध्या तरी वरिष्ठ पातळीवर आघाड्या करण्यासाठी बैठका सुरु आहेत.नवी समीकरणे : चुरस निश्चितकवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची राजकीय समीकरणे सारखी बदलू लागली आहेत. गेली दोन महिने संजयकाका आणि सगरे गटाची युती होणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र सोमवारी दुपारपासून सगळीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय सगरे व संजयकाकांची मैत्री संपुष्टात आल्याची चर्चा असून संजयकाका पाटील यांनी स्वबळावर नगरपंचयातीसाठी एल्गार पुकारला आहे, तर विजयराव सगरे यांनी घोरपडे व आबा गटाला जवळ करून निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. या अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे संजयकाका गटाला सगरे यांनी निवडणुकीपूर्वीच शह दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांचेही या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. यामुळे निवडणूक चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले आहे.