शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

सांगलीला ‘विनासिंचन’चे १५ टीएमसी पाणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:46 IST

सांगली : कृष्णा खोरे लवादासमोर झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला कमी पाणी आले आहे. येथील वंचित गावांना पाणी देण्यासाठी कृष्णा ...

सांगली : कृष्णा खोरे लवादासमोर झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला कमी पाणी आले आहे. येथील वंचित गावांना पाणी देण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पाण्याचे फेरवाटप झाले पाहिजे. त्याबाबत राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तोपर्यंत सिंचन नसलेल्या क्षेत्रातील ३३ टीएमसी आरक्षित पाणी १५ टीएमसीने कमी करुन ते सांगली जिल्ह्यातील वंचित गावांना देण्याचे नियोजन आहे. तसा प्रस्ताव अधिकाऱ्यांना करण्याचे आदेश दिल्याची माहिती कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनी येथे दिली.येथील पाटबंधारे विभागात शुक्रवारी कृष्णा खोरे महामंडळाच्या कामांबाबत बैठक झाली. त्या बैठकीतील निर्णयांची माहिती बानुगडे-पाटील यांनी दिली.ते म्हणाले की, राज्यातील बहुतांशी सिंचन प्रकल्पांची कामे काँग्रेस-राष्ट्रवादीने पन्नास वर्षात पूर्ण केली नाहीत, युतीच्या कालावधित कृष्णा खोरे महामंडळ स्थापन केल्यामुळेच १९९५ नंतर सिंचन योजनांची कामे पूर्ण केली. येत्या वर्षभरात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची शंभर टक्के कामे पूर्ण होतील.पाटबंधारे विभागाकडे अधिकारी, कर्मचाºयांचे पदे रिक्त असल्यामुळे पाणी वाटपासह वसुलीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. लवकरच सिंचन योजनांच्या पाणी वाटपासह पाणीपट्टी वसुलीची यंत्रणाही विकसित करण्यात येणार आहे. शेतकºयांकडून पाणीपट्टीचे पैसे घेतल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांना त्यांना पावती दिली पाहिजे. जे देत नसतील त्यांच्यावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.यावेळी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता नामदेव करे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख संजय विभुते, माजी नगरसेवक शेखर माने, हरिदास लेंगरे आदी उपस्थित होते.जतच्या ४२ गावांना पाणीजत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. राज्य सरकारशी चर्चा करुन निश्चित वंचित ४२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्णयही बैठकीत झाला. मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कालवा समितीमध्ये : शेतकºयांचा समावेशटेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांचे पाणी शेतकºयांच्या सोयीनुसार मिळत नाही, याबाबत शेतकºयांच्या तक्रारी आहेत. कालवा समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधींचा समावेश करुन घेणार आहे. यापुढे पाणी वाटपाचे वर्षाचे नियोजनच कालवा समितीच्या बैठकीत केले जाणार आहे. यामुळे शेतकºयांची पिके वाळणार नाहीत, असेही बानुगडे-पाटील म्हणाले.