शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाईन पार्कची जागा एमआयडीसीला द्या

By admin | Updated: July 27, 2014 23:08 IST

पलूसकरांची मागणी : विकासासाठी तरुणांची धडपड

पलूस : किर्लोस्कर कारखान्यामुळे पलूस व परिसरात उद्योजकतेची गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यामुळे पलूसची ‘एमआयडीसी’ आज वेगाने प्रगती करीत आहे. अपुऱ्या जागेमुळे या प्रगतीला मर्यादा पडत आहेत. जवळच असणाऱ्या व सध्या बंद असलेल्या ‘कृष्णा वाईन पार्क’मधील प्लॉट पलूसमधील तरुण उद्योजकांना मिळावेत, अशी मागणी येथील तरुणांमधून होत आहे.पलूस औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७५ मध्ये झाली. संस्थेने शासनाकडून ३५ एकर जागा खरेदी करून विकास केला. कोणत्याही प्रकारचे शासकीय सहकार्य नसताना किर्लोस्करवाडीच्या किर्लोस्कर उद्योग समूहाच्या पाठबळावर भरभराटीस आली आणि अनेक संकटांवर मात करीत आज प्रगतीपथावर आहे.किर्लोस्कर कारखान्यातून निवृत्त झालेल्या गुणवंत कामगारांना आपला स्वतंत्र उद्योग सुरू करता यावा, या हेतूने या कामगारांनी येथे प्लॉट घेतले. या कामगारांना किर्लोस्कर उद्योग समूहाने मार्गदर्शनच नव्हे, तर कामसुध्दा दिले. या संधीचे सोने करीत केवळ किर्लोस्कर कारखान्यावर अवलंबून न राहता या कामगारांनी इतर राज्यातूनसुध्दा कामे मिळवली. अनेक उद्योजकांनी स्वतंत्रपणे उद्योग सुरू करून मोठे यश मिळवले आणि उद्योजकतेमध्ये पलूसचे नाव नकाशावर आणले.शासनानेसुध्दा या औद्योगिक वसाहतीला पुरेशा दाबाने वीज पुरवठा करून सहकार्य केले आहे. पाणी पुरवठा, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. भारनियमन नसल्याने उद्योजक पूर्ण क्षमतेने उत्पादन घेत आहेत. येथील उद्योजक आणि संस्थेचे मार्गदर्शक विठ्ठलराव येसुगडे यांनी त्यांच्या सहकार्याने वसाहतीचा कायापालट केला आहे. आज या वसाहतीमध्ये एकूण १७0 उद्योग आहेत. पैकी १६७ उद्योग पूर्ण क्षमतेने चालू आहेत. कामगारांची संख्या ४ हजार २00 पर्यंत आहे. सध्या या वसाहतीमध्ये इंजिनिअरिंग जॉब वर्क, प्लॅस्टिक-रबर, सिमेंट पाईप, फौंड्री उद्योग, केमिकल उद्योग, फॅब्रिकेशन, कास्ट अलायन्स, शूज व अन्य देशपातळीवरील लौकिक प्राप्त केलेले उद्योग येथे आले आहेत. येथील काही उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. आज ही वसाहत प्रगतीपथावर असली तरी, अनेक परदेशी उच्च तंत्रशिक्षण घेतलेले तरुण पलूस एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आपले उद्योग उभारू शकत नाहीत. या गुणवंत तरुण उद्योजकांना जागेसाठी पर्याय म्हणून पलूसजवळ सांडगेवाडी येथे बंद असलेल्या कृष्णा वाईन पार्कमधील ५0 टक्के प्लॉट मिळावेत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याचे विठ्ठलराव येसुगडे यांनी सांगितले. (वार्ताहर)