शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

आंदळकरांचा ‘पद्मभूषण’ देऊन गौरव करा; कुस्तीप्रेमींची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:13 IST

शिराळा/पुनवत : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रातील मुकुटमणी हरपला आहे. शासनाने मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, तसेच तरूण मल्लांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांचे यथोचित स्मारक उभारावे, अशी मागणी सोमवारी पुनवत (ता. शिराळा) येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी मांडली.हिंदकेसरी गणपतराव आंदळकर ...

शिराळा/पुनवत : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रातील मुकुटमणी हरपला आहे. शासनाने मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, तसेच तरूण मल्लांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांचे यथोचित स्मारक उभारावे, अशी मागणी सोमवारी पुनवत (ता. शिराळा) येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी मांडली.हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे रविवारी सायंकाळी सात वाजता पुणे येथे निधन झाले. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर पुनवत या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हिंदकेसरी शिवाजीराव पाचपुते, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, विष्णू जोशीलकर, काका पवार, आनंदराव धुमाळ, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.गणपतराव आंदळकर हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. गावातील निवडणुका बिनविरोध करण्याकामी त्यांनी मोठे योगदान दिले. गावातील तंट्यांचाही निपटारा त्यांच्या माध्यमातून झाला. सार्वजनिक कामातही त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. परिसरात अनेक नामांकित मल्ल त्यांनी घडवले. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक ग्रामस्थ सद्गदित झाले.यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, कुस्ती क्षेत्राबरोबरच समाजकारण व राजकारणाचे आंदळकर यांच्या निधनामुळे न भरून येणारे नुकसान झाले आहे. तरूण मल्लांना त्यांनी कुस्ती क्षेत्राकडे वळवून कुस्तीचा लौकिक वाढविला. अनेक मल्ल घडविले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले की, देशाच्या मल्लविद्येचे भूषण, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आबा यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राचे किंबहुना तरुण मल्लांचे फार मोठे नुकसान झाले आहे. जगभर त्यांनी आपले नाव कमाविले होते. कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक मानसन्मान मिळवून नवीन मल्लांना तयार करत त्यांना वाव मिळवून देण्याचे काम केले. ग्रामीण भागात कुस्तीचा प्रसार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजकारण व समाजकारणात सहभागी होत, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. एक मोठी व्यक्ती जाण्याने कुस्ती क्षेत्राचे नुकसान झाले आहे.हिंदकेसरी आंदळकर यांचे बालपणीचे मित्र दत्तात्रय भोळे यांनीही त्यांच्या आठवणींंना उजाळा दिला. ते म्हणाले, आंदळकर यांना लहानपणापासून कुस्तीचा नाद होता. शाळेपेक्षा ते कुस्ती व गावाकडच्या खेळातही रमले. शेतीकाम व गुरांचा सांभाळही त्यांनी काहीकाळ केला. कुस्तीतले कसब पाहून वडील पांडुरंग माने यांनी त्यांना कोल्हापूरला पाठवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.अपघातातून बचावलेआॅलिम्पिक वीर बंडा पाटील आठवण सांगताना म्हणाले की, १९६३ ला मी, मारुती माने व आंदळकर आबा आम्ही दिल्लीला कुस्तीसाठी निघालो होतो. त्यावेळी कºहाडमधून बसमधून जाणार होतो. मात्र बस चुकली. त्यामुळे आम्ही ट्रकने जाण्यास निघालो. मात्र सातारच्या पुढे ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. त्यावेळी आम्ही तिघेही वाचलो. त्यावेळी ट्रक चालकाने आमच्या पाया पडून, ‘तुमच्यात देवमाणूस आहे, त्यामुळे तुमच्याबरोबर आमचेही प्राण वाचले’, असे म्हटले. या अपघातातून बचावलो, त्यामुळेच कुस्ती क्षेत्रातील मुकुटातील एक हिरा मिळाला, असेच म्हणावे लागेल.आंधळीत गाव बंद ठेवून श्रध्दांजलीपलूस : गणपतराव आंदळकर यांचे मूळ गाव असलेल्या आंधळी (ता. पलूस) गावातही सोमवारी सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रदांजली वाहण्यात आली. आंदळकर यांचे आजोबा जोतिराम माने हे शिराळा तालुक्यातील पुनवत येथे दत्तक गेले होते. तरीही त्यांचे मूळ गावाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. गणपतराव आंदळकर यांचा गावाला मोठा अभिमान होता. त्यांच्या सन्मानार्थ गावातील शाळेस गणपतराव आंदळकर यांचे नाव देण्यात आले आहे. रविवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. सोमवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. तसेच शाळांना सुटी देऊन ग्रामपंचायत व विविध संस्थांच्यावतीने गणपतराव आंदळकर यांना श्रदांजली वाहण्यात आली.