शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

शिराळा-वाळव्यास दुष्काळाच्या सवलती द्या

By admin | Updated: November 6, 2015 23:54 IST

रणधीर नाईक : अंत्री बुद्रुकमधून शिराळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह पदयात्रा

कोकरूड : शिराळा व वाळवा तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम वाया गेला असून, या गावांना दुष्काळाच्या सवलती मिळाव्यात. येथील शेतकऱ्यांवर विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा. आम्ही शासनविरोधी नाही. मात्र गरज पडल्यास शासनाविरोधात तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी शुक्रवारी दिला. अंत्री बुद्रुक ते शिराळा तहसील कार्यालय अशी साडेसात ते आठ किलोमीटरची पदयात्रा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. कार्यालयापुढे यावेळी पदयात्रेसाठी जमलेल्या हजारो शेतकऱ्यांसमोर नाईक बोलत होते. सकाळी दहा वाजता पदयात्रेस प्रारंभ झाला, तर दुपारी एक वाजता तहसील कार्यालयासमोर विसर्जन झाले. यावेळी सुखदेव पाटील, अ‍ॅड. बाबालाल मुजावर, विजय पाटील साखराळकर, प्रकाश पाटील, विजय कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. नाईक म्हणाले, यावर्षी शिराळा तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. प्रारंभी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाला नजरपाहणी अहवाल अत्यंत निष्काळजीपणे पाठवला आहे. त्यामुळे शासनाच्या निकषात शिराळा, वाळवा तालुका बसला नाही. शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठार, मेणी, येळापूर विभाग, काळुंद्रे व पणुंब्रे खोरा, शिंदेवाडी, संपूर्ण उत्तर विभाग व वाळवा तालुक्याच्या महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूची काही गावे पूर्णत: अवर्षणग्रस्त आहेत. महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेवर न जाता कार्यालयात बसून चुकीचा नजर पाहणी अहवाल शासनाला पाठविण्याचे पाप केल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड रोष आहे. शासनाने यावर्षी प्रथमच इंग्रज राजवटीच्या काळातील दुष्काळाचे निकष बदलून ५० टक्केऐवजी ६७ टक्के पिके आलेल्या गावात दुष्काळ जाहीर करावा, असा नवा निकष आणला आहे. त्यामुळे या निकषात शिराळा व वाळवा तालुक्यातील सर्व अवर्षणग्रस्त गावांना दुष्काळी सवलतींचा लाभ होणार आहे. नाईक म्हणाले, महसूल विभागाने यापूर्वी केलेली चूक पुन्हा करू नये. नाही तर शेतकरी तुम्हाला त्रास दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा दिला. दुष्काळात असणाऱ्या सर्व सवलतीसह सोयी-सुविधा मिळाव्यात व जलयुक्त शिवार योजनेत दुष्काळी गावाचा समावेश व्हावा, अशा मागणीचे निवेदन शिराळा तहसीलदारांना पहिल्यांदा आमच्याकडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर अवर्षणग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या सलग पंधरा दिवस बैठका घेतल्या व दुष्काळाबाबत त्यांच्यामध्ये जागृती केल्यामुळेच पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी संचालक आनंदराव पाटील, प्रकाश पाटील, उत्तम निकम, महेश पाटील, सुकुमार पाटील, संभाजी पाटील, दिनकर पाटील, पांडुरंग पाटील, एम. सी. पाटील, शंकर पाटील, संपत पाटील, दीपक खराडे, विश्वास पाटील, महादेव जाधव, सुनील पाटील, जयवंत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर) शेतकरी हवालदिल : प्रशासनाला जागे करणार नाईक म्हणाले, ही पदयात्रा शासनाविरोधात नाही, मात्र सुस्तावलेल्या भ्रष्ट प्रशासनाला जाग आणण्यासाठी ही पदयात्रा आहे. महसूल विभागात काम करणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. यंदा शेतकरी दुष्काळामुळे प्रचंड हवालदिल झाला आहे. मात्र प्रशासनाने शासनाला चुकीचा अहवाल पाठवला आहे. आता तरी झाकलेले डोळे उघडा आणि पीक कापणीचा, नंतर येणाऱ्या उत्पन्नाचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवा. जर असे झाले नाही, तर प्रथम प्रशासनाविरुद्ध व नंतर शासनाविरुद्ध शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करू.