शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 15:27 IST

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)च्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. पोदार स्कूलच्या सिध्दी सचिन घाटगे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

ठळक मुद्देसांगलीत सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजीसर्व शाळांचा शंभर टक्के निकाल

सांगली : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)च्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. पोदार स्कूलच्या सिध्दी सचिन घाटगे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.सांगलीतील ए. बी. पाटील इंग्लिश स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून सलग १८ वर्षे शाळेचा शंभर टक्के निकाल लागत आहे. यंदा प्रीती लोखंडे हिने ९५.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. नंदिनी मोरे (९५.६०), प्रगती नायक (९५.२०) आणि सौमित्र उत्तूरकर (९५.२०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थ्यांना संस्थापक सुरेश पाटील, जयश्री पाटील, प्रिया पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून सलग चौदा वर्षांपासून या शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम आहे. यात विराज रवींद्र मोहिते याने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर तनिष्का महेश माने (९६.८०), अनुराधा अरुण कुंभार व अर्णव आशिष तगारे (९६.४०) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थ्यांना बबनराव बिरनाळे, समीर बिरनाळे, सागर बिरनाळे, प्राचार्य आसिसी फुर्टाडो, शारदा खोत यांचे मार्गदर्शन मिळाले. तक्षिला स्कूलचाही शंभर टक्के निकाल लागला आहे. यात आराधना यादव हिने ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर अथर्व मगदूम (९६) व सिध्दी शहा (९४) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.पोदार इंटरनॅशनल स्कूलची सिध्दी सचिन घाटगे हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर आशुतोष बर्वे आणि आदित्य तिलक (९६.४०), ऋचा चौगुले आणि मोहित शहा (९६.२०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी गणितात, तर एका विद्यार्थ्याने संस्कृत आणि सामाजिक शास्त्र विषयात शंभर टक्के गुण मिळविले आहेत.

 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाResult Dayपरिणाम दिवसSangliसांगली