शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

दरीबडचीत महिलेसह मुलीचा खून

By admin | Updated: June 7, 2014 00:15 IST

जत तालुक्यात खळबळ : अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याची शक्यता

दरीबडची : दरीबडची (ता. जत) येथील वन विभागाच्या हद्दीत एका चोवीसवर्षीय गरोदर महिलेसह तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या दोघींचाही खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीस आज, शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मृतदेह आढळून आले. त्यानंतर जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उशिरापर्यंत या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली नव्हती. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरीबडची-जालिहाळ खुर्द मार्गावर वनक्षेत्र आहे. या रस्त्यावरच असणाऱ्या पशुवैद्यकीय रुग्णालयासमोर वन विभागाची हद्दी आहे. या परिसरात हे दोन्ही मृतदेह शुक्रवारी आढळून आले. यातील मृत महिला पाच ते सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. महिलेच्या तोंडावर, डोळ्यालगत, कानाच्या मागील बाजूस हातोडा, चाकूचे घाव वर्मी बसल्याचे दिसत होते. घटनास्थळी प्रचंड रक्तस्राव झाला होता. मुलीच्या तोंडावर हातोडासदृश हत्याराने मारहाण केल्याने तिचे दात पडल्याचे दिसून आले. मुलीच्या नाकावर व गालावरही वर्मी घाव बसले आहेत. वर्मी घाव बसल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. मृतदेहांशेजारी पाण्याची बाटली, केळीच्या साली, स्वेटर, टी-शर्ट, रक्ताने माखलेला रूमाल, तर मृतदेहांपासून थोड्या अंतरावर हातोडा, रूमाल, चिवड्याचे दाणे सापडले. मृत महिलेच्या अंगावर हिरवट पांढऱ्या ठिपक्यांची साडी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज, पायात जोडवी, हातात हिरव्या बांगड्या, उजव्या हातात काळा दोरा बांधलेला आहे. शरीराचा बांधा मध्यम असून रंग गोरा आहे, तर उंची साडेचार फूट आहे. मुलगी रंगाने सावळी असून तिच्या अंगात हिरव्या पट्ट्याचा टी-शर्ट आहे. अज्ञाताने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा दरीबडचीच्या वनक्षेत्रात आणून त्यांचा खून केला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची परिसरात चर्चा सुरू आहे. याबाबत कोतवाल मल्लू कोळी यांनी फिर्याद दिली असून, जत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)