इस्लामपूर : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर परिसरात होत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांत नेहमीच अग्रेसर राहिला आहे, असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी काढले.
जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरमार्फत इस्लामपूर पोलीस दलास २६ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही संच भेट देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संपूर्ण इस्लामपूर शहर सीसीटीव्हीयुक्त होत असून जायंटस्ने दिलेल्या दोन सीसीटीव्हीच्या संचांमुळे आमच्या या उपक्रमास मोलाची मदत झालेली आहे, असेही देशमुख यावेळी म्हणाले.
कार्यक्रमात जायंट्स ओपन जिमच्या उभारणीस हातभार लावलेल्या देणगीदारांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जायंटस्चे अध्यक्ष दुष्यंत राजमाने यांनी प्रशासनास अशाच प्रकारे सहकार्य करून जायंट्स ग्रुपची उज्ज्वल परंपरा कायम ठेवू, असा विश्वास उपस्थितांना दिला. या वेळेस कार्यवाह रणजित जाधव, युनिट डायरेक्टर राजकुमार ओसवाल व नितीन शहा, फेडरेशन उपाध्यक्ष प्रशांत माळी, माजी स्पेशल कमिटी मेंबर डॉ. नितीन पाटील व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यवाह रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले; तर ॲड. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.
फोटो :
ओळी : जायंट्स ग्रुपतर्फे इस्लामपूर पाेलिसांना सीसीटीव्ही संचासाठी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडे रक्कम सुपुर्द करण्यात आली.