शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील दोन कोटीच्या जागांचे आरक्षण उठविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

सांगली : तत्कालीन नगरपालिकेपासून महापालिका काळात भूखंडमाफिया, कारभारी आणि प्रशासनाने शहराच्या हिताच्या अनेक भूखंडांचा बाजार केला. आता पुन्हा भूखंडमाफिया ...

सांगली : तत्कालीन नगरपालिकेपासून महापालिका काळात भूखंडमाफिया, कारभारी आणि प्रशासनाने शहराच्या हिताच्या अनेक भूखंडांचा बाजार केला. आता पुन्हा भूखंडमाफिया सक्रिय झाले आहेत. कुपवाड, विश्रामबागमधील दोन कोटीहून अधिक रुपयांच्या जागांचे आरक्षण उठविण्याचा घाट घातला आहे. हा डाव उधळून लावू, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे.

ते म्हणाले, महापालिकेच्या विकास आराखड्यात ६५० पेक्षा अधिक आरक्षित भूखंड होते. या भूखंडांचा बाजार झाला आहे. कुपवाड येथील सात एकर जागेपैकी अडीच एकर जागेवर प्रायमरी स्कूलचे आरक्षण आहे. आरक्षण क्र. ३३८ ही जागा क्रीडांगणाचे आरक्षण असलेली आहे. परंतु गुंठेवारीतून तेथे घरे झाल्याचे कारण पुढे करून ते उठविण्याचा घाट घातला आहे.

गुंठेवारी कायद्यानुसार ९९ टक्केपेक्षा अधिक घरे झाली आहेत, त्या जागेचेच आरक्षण उठू शकते. पण सध्या जागेवर ३० टक्केपेक्षा कमी घरे आहेत. सात एकरात केवळ १७ प्लॉट पाडल्याचे दाखविले आहे. त्यामुळे आरक्षित अडीच एकरात किती घरे, प्लॉट आहेत याचाही विषयपत्रात उल्लेख नाही. काही आजी-माजी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तब्बल दीड वर्षाने हे विषयपत्र सभेसमोर आणले आहे. ऑनलाईन सभेत हा भूखंडबाजार करून शहराचे वाटोळे करण्याचा घाट सुरू आहे.

विश्रामबाग येथील ७५ गुंठे जागेवर प्ले ग्राऊंडचे आरक्षण होते. ते उठविण्याचाही घाट भूखंडमाफियांनी घातला आहे. दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात विषयपत्र तयार झाले होते. परंतु ते आजपर्यंत महासभेसमोर आले नाही. तेथे कोणत्याही प्रकारे नागरी वस्ती झाली नाही. यासंदर्भात हरकती मागविण्याची मुदत ३ डिसेंबरअखेर होती. परंतु हे विषयपत्र काचपेटीत त्यानंतर लावले आहे. महापालिकेचा हा डाव उधळण्यासाठी आता जनआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला.

भूखंडमाफिया सक्रिय

साखळकर म्हणाले, तत्कालीन काँग्रेस सत्तेत आरक्षण उठविण्याचा घाट घातला गेला. पण राज्यात भाजप महायुतीचे सरकार असल्याने ते महासभेसमोर आणले नव्हते. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने प्रशासन, कारभारी आणि भूखंडमाफिया सक्रिय झाले आहेत.