शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार, उपमहापौरपदी देवमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:49 IST

नाराजांना शांत करून भाजपने अखेर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात शुक्रवारी यश मिळविले. महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या ४३ विरूद्ध ३५ मतांनी पराभव केला. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जल्लोष केला. तर आघाडीचा चमत्काराचा दावा फोल ठरला.

ठळक मुद्दे सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार, उपमहापौरपदी देवमाने विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव

सांगली : नाराजांना शांत करून भाजपने अखेर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात शुक्रवारी यश मिळविले. महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या ४३ विरूद्ध ३५ मतांनी पराभव केला. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जल्लोष केला. तर आघाडीचा चमत्काराचा दावा फोल ठरला.शुक्रवारी सकाळी भाजपच्या नगरसेवकांना कोल्हापूरातून थेट महापालिकेत निवडीसाठी आणण्यात आले. तर कांँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्रितच महापालिकेत आले. वसंतदादा पाटील सभागृहात साडेअकरा वाजता महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली.सुरूवातीला महापौरपदासाठी दाखल अर्जाची छाननी झाली. यात राष्ट्रवादीच्या मालन हुलवान यांचा अर्ज अवैध ठरला. त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडलेले नव्हते. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपच्या गीता सुतार व काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांच्या लढत झाली.

हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात सुतार यांना ४३ तर निंबाळकर यांना ३५ मते मिळाली. त्यानंतर उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. यावेळी काँग्रेसच्या मनोज सरगर यांनी अर्ज मागे घेतला.उपमहापौरपदासाठी भाजपचे आनंदा देवमाने व राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात रिंगणात होते. यात देवमाने यांना ४३ तर थोरात यांना ३५ मिळाली. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत एकच जल्लोष केला.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, सुयोग सुतार, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी नूतन महापौर, उपमहापौरांचा सत्कार केला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली