शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाचा गुडमॉर्निंग पथकावर तलवार हल्ल्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 21:22 IST

महापालिका कर्मचा-यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पांडुरंग मोरे या गुंडाने दगडफेक करीत पलायन केले

मिरज, दि. 29 - मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर महापालिकेच्या गुडमॉर्निंग पथकावर तडीपार गुंडाने तलवार हल्लयाचा प्रयत्न केला. महापालिका कर्मचा-यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पांडुरंग मोरे या गुंडाने दगडफेक करीत पलायन केले. प्रकारामुळे महापालिका प्रशासनाने गुडमॉर्निंग पथकासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. उघड्यावर शौचास जाणा-यांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका कर्मचा-यांची गुडमॉर्निंग पथके शहरातील विविध झोपडपट्ट्यांच्या परिसरात सकाळच्यावेळी गस्त घालीत आहेत. उघड्यावर शौचाला जाणा-यांना प्रतिबंध करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आज कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वेगेटलगत असलेल्या झोपडपट्टीजवळ गुडमॉर्निंग पथक गेल्यानंतर पांडुरंग मोरे हा उघड्यावर शौचाला जाताना दिसल्याने त्यास हटकण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या मोरे याने घरातून तलवार आणून गुडमॉर्निंग पथकावर हल्लयाचा प्रयत्न केल्याने कर्मचा-यांनी पलायन केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त संभाजी मेथे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर पांडुरंग मोरे याने त्यांच्यावर दगडफेक करीत पलायन केले. पांडुरंग मोरे हा भिलवडी परिसरातील तडीपार गुंड असून, त्याच्यावर पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. महापालिकेचे गुडमॉर्निंग पथक महिनाभर दररोज सकाळी कृष्णाघाट रस्त्यावरील झोपडपट्टीत जाऊन उघड्यावर शौचाला प्रतिबंध करीत असल्याने मोरे याने आज तलवार हल्लयाचा प्रयत्न करून पथकाला पिटाळून लावले. गुडमॉर्निंग पथकाच्या कारवाईमुळे दररोज अनेक ठिकाणी वादावादी, दमदाटीचे प्रकार घडत असून, तलवार हल्ल्याच्या प्रयत्नामुळे गुडमॉर्निंग पथकासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करणार असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.