शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कचरा ही आपत्ती नव्हे, संपत्ती! संजय कांबळे : महापालिकेच्या व्याख्यानमालेची सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:58 IST

कचरा निर्मूलनाकडे सेवाभावी संस्थांनी संपत्ती म्हणून पाहिले पाहिजे, असे मत लातूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी व्यक्त केले. सांगली महापालिकेच्या वि. स. खांडेकर

सांगली : कचरा निर्मूलनाकडे सेवाभावी संस्थांनी संपत्ती म्हणून पाहिले पाहिजे, असे मत लातूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी व्यक्त केले. सांगली महापालिकेच्या वि. स. खांडेकर वाचनालयाच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना कांबळे बोलत होते.शाळा नं. १ मध्ये वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते यांनी दीपप्रज्ज्वलन करुन केले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, रोहिणी पाटील, सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील, सहाय्यक आयुक्त एस. एस. खरात, गौतम भिसे, संभाजी मेथे, सिस्टिम मॅनेजर नकुल जकाते आदी उपस्थित होते.

सुरुवातीला सभापती बसवेश्वर सातपुते यांनी वक्ते संजय कांबळे यांचे पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. यावेळी लातूर शहरात कचरा वेचक काम करणाऱ्या महिलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी आपल्या कार्याची ओळख प्रात्यक्षिकासह सादर केली.

ते म्हणाले, लातूर शहरात आम्ही कचरा वेचक म्हणून काम करणाºया महिलांची ‘जनसेवा घनकचरा व्यवस्थापन सहकारी संस्था’ नावाची संस्था स्थापन केली व लोकसहभागातून कचरा निर्मूलन केले. स्वच्छतेसाठी सेवाशुल्क गोळा केले. काच, कागद, प्लॅस्टिक अशा कचºयातून उत्पन्न निर्माण करुन दिले. महिन्याला ८० लाखाच्या वर उलाढाल कचºयातून होऊ शकते. श्री. कांबळे यांनी, कचरा वेचक म्हणून काम करणाºया महिलांसाठी काम करताना आलेल्या अडचणी, त्यावर मात करीत स्थापन केलेली संस्था, त्यातून कचरा वेचणाºया महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यात आलेले यश... अशी यशोगाथा चलचित्राद्वारे मांडली.सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावाकांबळे म्हणाले, कचरा ही आपत्ती नव्हे, तर संपत्ती आहे. नियोजन केल्यास उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन, संस्था स्थापन करुन कचºयापासून महिलांना नवा रोजगार निर्माण करून देण्याची गरज आहे. कचरा हे सोने आहे, ते हाताळता आले पाहिजे.महापालिकेच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे उद््घाटन स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते यांच्याहस्ते झाले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, दिलीप पाटील, एस. व्ही. पाटील, संजय कांबळे उपस्थित होते.