शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गणेशोत्सवाच्या बाजाराला महागाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:42 IST

सांगली : उत्सवातील अनेक घटकांना स्पर्श करीत महागाईने बाजारात ठाण मांडल्यामुळे, यंदा भाविकांमध्ये उत्सवाचा उत्साह असतानाच महागाईबद्दलची नाराजीही स्पष्टपणे ...

सांगली : उत्सवातील अनेक घटकांना स्पर्श करीत महागाईने बाजारात ठाण मांडल्यामुळे, यंदा भाविकांमध्ये उत्सवाचा उत्साह असतानाच महागाईबद्दलची नाराजीही स्पष्टपणे दिसत होती. गणपतीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा कापूर महागाईला चिकटूनच आहे. फुलांच्या आणि पर्यायाने हारांच्या दरातही मोठी वाढ झाली असून आरास साहित्याचेही दर वाढले आहेत.दरवर्षी केवळ मूर्तींच्या किमतीत थोडी वाढ होत असते. मात्र पूजा साहित्य व आरास साहित्याच्या दरात फारशी वाढ दिसत नाही. पण यंदा अनेक कारणांनी महागाईने डोके वर काढले आहे. महापुराचा मोठा परिणाम पूजा साहित्यावर दिसून येत आहे. त्यामुळे भाविकांनी वाढत्या महागाईबद्दल नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात परंपरेप्रमाणे लागणाऱ्या सर्व गोष्टी खरेदी कराव्या लागतात. त्यात कधीही काटकसर केली जात नाही. त्यामुळे महागाईची झळ सोसतच उत्सवाचा उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूजा साहित्यात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या कापराचा दर गतवर्षापासून शिखरावरच आहे. महागाईची संगत कापूर सोडण्यास तयार नसल्याने कापराचे दर ऐकून भाविकांना धक्का बसत आहे. २0१७ मध्ये ३०० रुपये प्रति किलो असणारा कापूर २0१८ मध्ये तिप्पट दरवाढ घेऊन दारी आला होता. यावर्षीही कापूर १२०० रुपये किलोने होलसेल बाजारात विकला जात आहे. किरकोळ बाजारातील विक्री तर आणखी महाग झाला आहे.फुलांनीही दरात उसळी घेतली आहे. शेवंती, झेंडू तसेच पांढºया फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे छोट्या-मोठ्या हारांच्या किमतीही वाढल्या आहेत. फुलांची आरास करणेही परवडत नसल्याची भावना भाविक व्यक्त करीत आहेत. गतवर्षी बंदीमुळे थर्माकोलच्या कमानी बाजारातून गायब झाल्या होत्या. यंदा दबक्या पावलांनी थर्माकोलचे आरास साहित्य बाजारात आले आहे. त्याला पर्याय म्हणून फायबर, लाकडी, फोमच्या कमानी बाजारात आल्या आहेत.