शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

महापालिकेवर गाढव मोर्चा : सांगलीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:37 IST

वाल्मिकी आवास योजनेसह इतर ठिकाणी असलेल्या दलित घरकुलांना नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देनागरी सुविधांसाठी दलित महासंघातर्फे जोरदार घोषणाबाजी

सांगली : वाल्मिकी आवास योजनेसह इतर ठिकाणी असलेल्या दलित घरकुलांना नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी महापौर व आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली. तसेच महापौर व आयुक्त निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने कार्यकर्त्यांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रातील दलित कुटुंबीय झोपडपट्टीत राहत होते. मात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली दलित कुटुंबियांना वाल्मिकी आवास योजनेसारखी घरकुले बांधून दिली. मात्र त्या ठिकाणी गटारी, रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी कोणत्याही सुविधा महापालिकेने दिल्या नाहीत. याविरोधात दलित महासंघाने यापूर्वी मोर्चा काढला होता. मोर्चा काढल्यानंतर महापालिकेने आठ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले. पण आश्वासन देऊन तीन महिने उलटले तरी, कामांना सुरूवात झाली नाही. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. त्यामुळे पुन्हा घरकुल धारकांना सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे.

महापौर व आयुक्तांनी वाल्मिकी आवास, शिवशंभो कॉलनी, आरवाडे प्लॉट, शिंदे मळा, जुना बुधगाव रोड, रेपे प्लॉट, पंचशीलनगर, लक्ष्मीनगर आदी भागातील गटारी, रस्ते, ड्रेनेजची कामे तत्काळ करावीत, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपायुक्त व प्रशासकीय अधिकारी गेले होते. मात्र त्यांनी निवेदन देण्यास नकार दिला. महापौर व आयुक्त आल्याशिवाय निवेदन देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना महापालिका कर्मचाऱ्यांनी अडविले.

या आंदोलनात संपर्कप्रमुख महेश देवकुळे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शेलार, राजाभाऊ खैरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वनीताताई कांबळे, अजित आवळे, किशोर आवळे, अभिमन्यू वाघमारे, सागर कांबळे, सुनील वारे, राकेश चंदनशिवे, विटाताई देवकुळे, कल्पना चव्हाण, रेखा आवळे, अर्चना घाटगे, सोनाली कांबळे आदी सहभागी झाले होते.आता चप्पल मोर्चाकार्यकर्त्यांनी महापौर व आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली. आठ दिवसात नागरी सुविधा न मिळाल्यास आयुक्तांच्या घरावर चप्पल मोर्चा काढण्याचा इशारा मोहिते यांनी दिला.

टॅग्स :Morchaमोर्चाSangliसांगलीPoliticsराजकारण