सांगली : भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आ. सुधीर गाडगीळ यांची, तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीराज देशमुख यांची निवड गुरुवारी जाहीर करण्यात आली. प्रकाश बिरजे यांची राष्ट्रीय परिषदेवर निवड करण्यात आली असून अन्य तालुकाध्यक्ष व राज्य परिषदेवरील सदस्य पदांच्या निवडीही पार पडल्या. येथील टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी निवडीचा कार्यक्रम पार पडला. आमदार सुरेश हाळवणकर, बाबा देसाई यांनी या निवडी जाहीर केल्या. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आदी उपस्थित होते. यावेळी खासदार पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जनता कंटाळली होती. त्यामुळेच त्यांनी भाजपला कौल दिला. आम्ही भाकरी परतवली. त्यामुळे जिल्ह्यात भाजपमय वातावरण झाले आहे. आ. गाडगीळ म्हणाले की, या पदासाठी मी इच्छुक नव्हतो. तरीही पक्षाचा निर्णय हा अंतिम असल्याने जबाबदारी स्वीकारली आहे. ही जबाबदारी सार्थ ठरवून जिल्हा परिषद व नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकवू, असा विश्वास गाडगीळ यांनी व्यक्त केला. पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, जुना-नवा वाद न ठेवता एकसंधपणे काम करू. म्हैसाळ पाणी योजनेचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. पक्षीयस्तरावर ताकद लावून ही योजना मार्गी लावू. लोकांचे प्रश्न सोडविण्यालाच प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)नवीन तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकारी असे...पलूस - विजय पाटील, जत - चंद्रकांत गुड्डोडगी, तासगाव (ग्रामीण) - डॉ. पी. के. पाटील, तासगाव (शहर) - माणिकराव जाधव, कवठेमहांकाळ - अनिल लोंढे, इस्लामपूर (शहर)- संभाजी केशवराव पवार, वाळवा (ग्रामीण)- शंकर अण्णा पाटील, शिराळा - सुखदेव पाटील, मिरज - दिनकर भोसलेनवीन राज्य परिषद सदस्यमिरज - अशोक ओंबासे, वाळवा - बाबासाहेब सूर्यवंशी, पलूस-कडेगाव - शिवाजीराव जाधव, शिराळा - प्रताप पाटील, खानापूर-आटपाडी- विनोद गोसावी, तासगाव-कवठेमहांकाळ - मिलिंद कोरे, जत - डॉ. रवींद्र आरळी, सांगली - हणमंत रघुराम पवारइनामदारांची गैरहजेरी चर्चेचा विषयमावळते शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार या निवडीवेळी गैरहजर होते. अन्य कोणत्याही पदावर त्यांची निवड झाली नसल्याने, त्यांच्या नाराजीबद्दलची चर्चा यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
शहर जिल्हाध्यक्षपदी गाडगीळ
By admin | Updated: January 15, 2016 00:14 IST