शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

‘तरुणाई’च्या हातात उमेदवारांचे भवितव्य!

By admin | Updated: October 9, 2014 23:04 IST

प्रमाण एकवीस टक्क्यावर : जिल्ह्यात साडेचार लाख तरुण मतदार

नरेंद्र रानडे - सांगली -लोकसभा निवडणुकीत प्रत्यय आल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तरुणाईचे वारे ज्या उमेदवाराच्या दिशेने वाहील, त्याच्या विजयाची नौका किनाऱ्याला लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात तब्बल ४ लाख ६३ हजार ७२० मते ‘तरुणाई’ची आहेत. एकूण मतदानाच्या तुलनेत २१ टक्के निर्णायक मते तरुणांच्या हातात आहेत. मतांचे गणित लक्षात घेऊन उमेदवारांचे लक्ष तरुणाईवरच आहे. विधानसभा निवडणुका पंचरंगी होत आहेत. यामुळे प्रत्येक पक्षाला स्वबळ तपासता येणार आहे. निवडणुका जिंकायच्या असतील तर, नव्या दमाचा तरुण मतदार कसा आकर्षित होईल, यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहेत. प्रचारातदेखील तरुणाईचा वावर वाढत चालला आहे. तरुणांनी निष्क्रिय न राहता अधिकाधिक प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयांतूनही मतदानाचा जागर नित्यनेमाने सुरु आहे. परिणामी निवडणुकीत पुन्हा मतदान केंद्राबाहेर युवकांच्या रांगा लागलेल्या दिसल्या, तर आश्चर्य वाटायला नको. उमेदवारांना तरुणाईच्या ताकदीचा अंदाज आल्याने दिवसातून प्रचार कार्यक्रमातील ठराविक बैठका या पिढीसोबत होत आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्याची आश्वासने देण्यात येत आहेत. तरुण पिढी आपल्याकडे वळवण्यासाठी पक्षाचे नेतेदेखील प्रयत्नशील आहेत.मतदारसंघाचे नाव तरुण मतदारमिरज५९,४२५सांगली६६,७४९इस्लामपूर५२,२३४शिराळा५५,९६४पलूस-कडेगाव५७,५८९खानापूर६२,९३३तासगाव-क.महांकाळ५४,२५७जत५४,५७८तेरा हजार तरुणाईचे पहिल्यांदाच मतदान१ जानेवारी २०१४ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांना यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने यंदा महाविद्यालयातर्फे जागृती केल्याने युवकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच दि. १५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील १३,१८६ युवक पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.