शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

सिध्देवाडीत क्रीडांगणासाठी निधी देऊ

By admin | Updated: November 30, 2014 22:11 IST

उत्तमराव वाघमोडे : शिक्षकांच्या अडीअडचणी व कामकाजाची घेतली माहिती

मालगाव : सिध्देवाडी (ता. मिरज) येथील प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंती व क्रीडांगणासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांनी दिले. यावेळी त्यांनी शाळेच्या कामकाजाचीही माहिती घेत शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.गटविकास अधिकारी वाघमोडे हे ग्रामस्वच्छतेच्या कार्यक्रमासाठी सिध्देवाडी येथे आले होते. यावेळी वाघमोडे व पंचायत समितीच्या सदस्या सारिका खताळ यांनी शाळेला भेट दिली. शिक्षकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नव्याने बांधण्यात आलेल्या आठ शाळा खोल्यांच्या बांधकामाची पाहणी केली. कमी निधीत चांगल्या प्रतीचे बांधकाम केल्याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे कौतुक केले. शाळेच्या शौचालयांचीही पाहणी केली. गटविकास अधिकाऱ्यांनी शाळेत वृक्ष लागवडीचा मुद्दा उपस्थित केला असता, संरक्षक भिंतीअभावी वृक्ष लागवड करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुबेर खोत, शिक्षक रामचंद्र चव्हाण यांनी संरक्षक भिंत व क्रीडांगणासाठी निधीची आवश्यकता असल्याची समस्या मांडली. गटविकास अधिकारी वाघमोडे यांनी या मागणीची दखल घेत दोन्ही कामांचे ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव पाठविण्याची व्यवस्था करा, निधी मिळवून देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. दत्तात्रय कवठेकर, संजना शेळके, विद्या कांबळे, अश्विनी विटेकरी, सुवर्णा गळवे उपस्थित होते. (वार्ताहर)विद्यार्थ्यांची घेतली परीक्षा !शाळा भेटीत गटविकास अधिकारी वाघमोडे यांनी इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सामान्यज्ञानाबाबत परीक्षा घेतली. प्रारंभी त्यांनी विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. वाचनात विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येताच त्यांनी सामान्यज्ञानाचा एक भाग म्हणून गावच्या सरपंचांचे नाव विचारले. विद्यार्थ्यांनी तात्काळ उत्तर दिले. शिक्षक रामचंद्र चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे नाव विचारले असता, उत्तमराव वाघमोडे या दिलेल्या उत्तराने गटविकास अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.