माेरे म्हणाले, गतवर्षी दिघंची परिसरात पावसाने थैमान घातल्यामुळे माणगंगा नदीला पूर आला होता. त्यातच ढोलेमळा पुलाचा भराव वाहून गेला होता. दिघंची ते ढोले मळा हा रस्ता अनेक वर्षे रखडला होता. परंतु आमदार बाबर व तानाजीराव पाटील यांनी त्याचा प्रश्न निकाली काढला. पावसाळ्यापूर्वी याचे काम पूर्ण झाले. ढोले मळा या ठिकाणी पुलही बांधण्यात आला होता. मात्र, माणगंगा नदीला पूर आल्याने या पुलाचा भरावा वाहून गेला. त्यावेळी आमदार बाबर यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली होती. या पुलासाठी २७ लाख मंजूर झाले आहेत. मोरी दुरुस्तीसाठी पाच लाख व तरटीमळा येथील पुलासाठी पाच लाख रुपये मंजूर झाल्याचे सरपंच मोरे यांनी सांगितले.
ढोले मळा पूल दुरुस्तीसाठी २७ लाखांचा निधी : अमोल मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST