लंगरपेठ येथील जिल्हा परिषद शाळेची राज्यस्तरावर माॅडेल स्कूलसाठी कवठेमहांकाळ तालुक्यातून एकमेव निवड झाली आहे. या माॅडेल स्कूल अंतर्गत नावीन्यपूर्ण बदल होणार आहेत. यासाठी लागणारा निधी हा जिल्हा परिषद व लोकसहभागातून करावयाचा आहे. यासाठी लंगरपेठ शाळेसाठी लोकांनी देणग्या देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच महेश पवार यांनी केले होते. याला प्रतिसाद देत शिंदे दांम्पत्याने निधी दिला आहे. याबद्दल सरपंच व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उपसरपंच यशवंत शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी कोळेकर, दादासाहेब कोळेकर, शारदा घोरपडे, सुषमा गुरव, बाबासाहेब शिंदे, संजय गरड उपस्थित होते.
फोटो : ३०ढालगाव१
फोटो ओळ : लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेस सीताराम शिंंदे व शकुंतला शिंदे यांनी दिलेला निधी सरपंच महेश पवार यांनी स्वीकारला.