शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ कायदा हा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2015 00:13 IST

रघुनाथदादा पाटील : कवलापुरात शेतकरी मेळावा

बुधगाव : कोणाच्याही संमतीने उसाच्या ‘एफआरपी’चा कायदा कारखानदारांनाही मोडता येत नाही आणि मुख्यमंत्र्यांनाही. तो आमचा हक्क आहे. मुख्यमंत्र्यांनीच कायदा मोडण्याचे वक्तव्य करणे, हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी कवलापूर (ता. मिरज) येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात केले.उसाची एफआरपी किंमत एकरकमी मिळावी आणि अंतिम भाव ३ हजार ५०० रुपये मिळावा, या मागण्या मेळाव्यात करण्यात आल्या. रघुनाथदादा म्हणाले की, राज्य सरकारने कळविलेल्या ऊस उत्पादन खर्चापेक्षा केंद्राने जादा खर्च मान्य केला आहे. मात्र स्वामीनाथन् समितीच्या शिफारसीनुसार ऊस दर देण्यास केंद्र सरकारही अद्याप तयार झालेले नाही. स्वाभिमानी संघटनेच्या नावावर काहींची शेतकऱ्यांशी बेईमानी सुरु आहे. एक टन उसाच्या उत्पादनापासून राज्य आणि केंद्र सरकारला सुमारे ४ हजार रुपये कर मिळतो. मात्र दुसरीकडे शेतकरी देशोधडीला लागला आहे.शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा, डाळींसह सर्वच शेतीमालाला योग्य हमीभाव दिल्यास अशी वेळ येणार नाही.राजारामबापू कारखान्याच्या अखत्यारीतील ‘वाटेगाव, सर्वोदय’ला वेगळा दर आणि ‘जत’ला वेगळा दर, असे चालणार नाही. जत कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावे. कायद्यानेच त्यांना जाब विचारुया.क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदरिवले म्हणाले की, कारखानदारांचा शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग थांबविण्यासाठी शेतकऱ्यांंनी एकत्र येऊनच त्यांना झुकवावे लागेल. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने यांनी स्वागत केले. आभार अरुण सावंत यांनी मानले. यावेळी अशोक पाटील, किसनराव बोधले-पाटील, प्रकाश हाक्के यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)हमीभाव देण्याची गरजसरकार बाहेरून ४७ रुपये किलोने कांदा, १४७ रुपये किलो दराने तुरडाळ आयात करते. मात्र इथल्या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा, डाळींसह सर्वच शेतीमालाला योग्य हमीभाव दिल्यास अशी वेळ येणार नाही, असे रघुनाथ पाटील म्हणाले.