शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात खासदारांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: March 24, 2016 23:46 IST

नगरपालिकेत विकास कामांची धुळवड : सत्तेचे कारभाऱ्यांकडून मार्केटिंग

दत्ता पाटील --तासगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता आणण्याची किमया खासदार संजयकाका पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी करुन दाखवली. आता पुढची पाच वर्षे पालिकेचा गड ताब्यात ठेवण्यासाठी खासदार संजयकाकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दरबारात ठाण मांडून शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. दुसरीकडे भाजपच्या सत्तेचे फलित म्हणून शहरासाठी मिळत असलेल्या निधीचे पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून पुरेपुर मार्केटिंग केले जात आहे. भाजपच्या विकासाची धुळवड ही, पालिका निवडणूकीसाठी असल्याचे दिसून येत आहे. तासगाव नगरपालिकेत पाच महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त सत्तेला खिंंडार पाडून संजयकाकांनी भाजपची एकहाती सत्ता आणली. या काळात संजयकाकांनी शासनस्तरावरुन मुख्यमंत्र्यांकडे वजन वापरुन, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला उपलब्ध करुन दिला. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निधी आणून तासगावकरांना सुविधा देण्यासाठी भाजपचे सत्ताधारी प्रयत्नशील असल्याचे दाखवून दिले.संजयकाकांकडून पालिकेसाठी मिळालेल्या निधीचे नगराध्यक्षांसह सत्ताधारी कारभाऱ्यांनी मार्केटिंग सुरु केले आहे. खासदार संजयकाकांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जानेवारी महिन्यात, त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा मार्च महिन्यात शहरातील प्रत्येक प्रभागात विकास कामांचे नारळ फोडण्यात आले. स्वत: संजयकाकांनी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शहरातील गल्लीबोळ पिंजून काढले. प्रत्येक प्रभागात कामाचे उद्घाटन झालेल्या ठिकाणी फलक लावण्यात आले. इतकेच नव्हे, तर खासदार संजयकाकांच्या प्रयत्नातून पालिकेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाल्याचे डिजिटल फलकही सत्ताधारी गटाकडून चौका-चौकात लावण्यात आले आहेत.केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. या सत्तेचा फायदा पालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना होत असल्याचे चित्र विकास कामांच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत आहे. पालिकेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. या निवडणुकीचे मार्केटिंग करण्यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आतापासूनच कंबर कसल्याचे चित्र आहे. संजयकाकांनीही निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपमध्ये नाराजीचे आव्हानपालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी विकास कामांचे मार्केटिंग सुरु केले आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष बदलावरुन भाजपमधील एक गट आग्रही झाला आहे. मात्र संजयकाकांसमोर उघडपणे भावना व्यक्त करण्याचे धाडस होत नसल्याने, नगराध्यक्ष बदलाचा विषय हा चर्चेचे गुऱ्हाळ बनला आहे. नगराध्यक्ष निवड आणि बदलावरुन भाजपांतर्गत नगरसेवकांतच मोठी धुसफूस सुरु आहे. तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांची नाराजीही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे भाजपमधील कारभाऱ्यांच्या नाराजीचे आव्हान पेलावे लागणार आहे.