अंकलखोप येथे राजेश चौगुले फौंडेशनच्यावतीने स्वातंत्र्यसेनानी श्रीपाल बळवंत बिरनाळे यांचा सत्कार करताना अध्यक्षा सौ. शीतल चौगुले. बाजूस राजेश चौगुले, सरपंच अनिल विभुते, घन:श्याम सूर्यवंशी.
अंकलखोप : येथील मा. राजेश चौगुले फौंडेशनच्यावतीने स्वातंत्र्यसेनानी श्रीपाल बळवंत बिरनाळे यांचा सत्कार करण्यात आला.
अंकलखोप व परिसरातील क्रांतिवीरांच्या जन्मभूमी व कर्मभूमीत पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यासाठी चोवीस स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग होता. त्यापैकी २३ स्वातंत्र्यसैनिक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ९७ वर्षे वय असलेले एकमेव स्वातंत्र्यसेनानी श्रीपाल बिरनाळे हयात असून त्यांचा सपत्निक सत्कार अध्यक्षा सौ. शीतल चौगुले यांच्याहस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.
आप्पासाहेब सकळे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच अनिल विभुते, अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेश चौगुले, घन:श्याम सूर्यवंशी, फौंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र कुंभार, विकास सूर्यवंशी, सुभाष चौगुले उपस्थित होते.