आटपाडी : आटपाडी येथील गणपतराव देशमुख दूध संघाच्या कार्यालयाच्या पाठीमागे राहात असलेल्या महिलेच्या घरातील चाळीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना बुधवार, दिनांक २३ रोजी रात्री घडली. बाळाबाई बाबासाहेब जाधव या संपतराव देशमुख को - ऑपरेटिव्ह मिल्क युनियन दूध संघाच्या पाठीमागे राहतात. त्यांच्या घराला बाहेरून लावलेली कडी काढून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, पाच ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातील झुबे व फुले, दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील दोन बुगड्या आणि चांदीचे पैंजण, मासोळ्या असा ४० हजारांचा ऐवज लंपास केला. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार एम. एस. बांगरे करीत आहेत.
आटपाडीत ४० हजारांची चाेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST