शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळे चाचणी अहवाल, विधानपरिषदेत आमदारांनी विचारला जाब

By संतोष भिसे | Updated: July 27, 2023 17:52 IST

सांगलीतील प्रयोगशाळांवर कारवाईची मागणी

सांगली : एकाच रुग्णाच्या रक्ताचे चार प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळे चाचणी अहवाल आल्याचा प्रकार सांगलीतील डॉ. योगेश माईणकर यांनी उघडकीस  आणला होता. हा विषय विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करण्यात आला असून संबंधित प्रयोगशाळांवर कारवाईची मागणी आमदारांनी केली आहे.आमदार अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण व अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत आरोग्यमंत्र्यांना याविषयी विचारणा केली. त्यांनी सांगितले की, सांगलीतील आयुर्वेद वैद्य डॉ. योगेश माईणकर यांनी त्यांच्या एका मधुमेहग्रस्त रुग्णाच्या रक्ताची चार नामांकित प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली. प्रत्येक प्रयोगशाळेतून चाचणीचे वेगवेगळे धक्कादायक अहवाल आले. एकामध्ये साखरेचे प्रमाण १२६ दर्शविले होते. दुसऱ्यामध्ये ३०० आणि तिसऱ्या प्रयोगशाळेने ३९० साखर सांगितली होती. चौथ्या प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालात रक्तातील साखरेचे प्रमाण तब्बल ४२१ असल्याचे सांगितले होते.आमदारांनी सांगितले की, चारही प्रयोगशाळा जुन्या असून तज्ज्ञ डॉक्टर्स तेथे काम करतात. तरीही असे चुकीचे व दिशाभूल करणारे अहवाल त्यांनी दिले आहेत. या अहवालांमुळे रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रयोगशाळांमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचे स्पष्ट होते.यावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, डॉ. माईणकर यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाकडे रितसर तक्रार दाखल केलेली नाही. जिल्हा शल्यचिकित्सक किंवा महापालिकेकडे दाद मागितली नाही, त्यामुळे चौकशी झालेली नाही. तथापि, हे प्रकरण थेट नागरिकांच्या जिविताशी निगडीत आहे, त्यामुळे एक चौकशी समिती नेमून त्याची रितसर चौकशी केली जाईल. दोषी सापडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. पॅथॉलॉजी प्रयोगशाळांच्या नोंदणीसाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल.

चांगला रुग्णही आजारी पडेलआमदारांनी आरोग्य मंत्र्यांना सांगितले की, प्रयोगशाळांच्या चुकीच्या चाचणी अहवालांमुळे चांगला रुग्णही आजारी पडण्याचा धोका आहे. अहवालावर भरोसा ठेवून औषधोपचार घेतल्यास त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या प्रयोगशाळांमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे या चार प्रयोगशाळांसह जिल्ह्यातील सर्वच प्रयोगशाळांची चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३