शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:19 IST

वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक १३,६८३ क्युसेक असल्याने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे रविवारी सकाळी १० वाजता ०.५० मीटरने खुले करण्यात आले असून त्यातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू केला होता. सायंकाळी चार वाजता एक मीटरने दरवाजे उचलण्यात आले. त्यावेळी ...

वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक १३,६८३ क्युसेक असल्याने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे रविवारी सकाळी १० वाजता ०.५० मीटरने खुले करण्यात आले असून त्यातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू केला होता. सायंकाळी चार वाजता एक मीटरने दरवाजे उचलण्यात आले. त्यावेळी ४२०० क्युसेक व वीज निर्मितीकडून ५९२ व उच्चस्तर द्वारातून ८०० क्युसेक असा एकूण ३४९२ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. चांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाण्याने शनिवारी सांडवा पातळी ओलांडली होती. त्यामुळे रविवारी सकाळी दहा वाजता धरणाचे चारही दरवाजे ०.५० मीटर उचलून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. वीजनिर्मिती केंद्रातून ५९२ व उच्चस्तर द्वारातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना अगोदरच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला ८१० मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा त्याचे प्रमाण १३२४ मिलिमीटर इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५१४ मिलिमीटर पाऊस अधिक बरसला आहे. १७.९५ टीएमसी पाणीसाठा होता, तर यंदा २७.७७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ८०.७१ आहे.सतर्कतेचा इशारावारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.