शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

खटावमधील राष्ट्रवादी नेत्याच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 14:59 IST

खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून दहा लाखांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याची प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखटावमधील राष्ट्रवादी नेत्याच्या खूनप्रकरणी चौघांना अटकपूर्ववैमनस्यातून दहा लाखांची सुपारी देऊन खून

सांगली : खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून दहा लाखांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याची प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.दत्तात्रय रामदास जाधव (वय ३३, रा. निरा ता. बारामती जि. पुणे), अतुल रमेश जाधव (वय २२, रा. बावडा ता. खंडाळा जि. सातारा), लक्ष्मण बाबुराव मडिवाल (वय ६०) व अरविंद शंकर पाटील (वय ६५, दोघेही रा. खटाव ता. पलूस) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते व खटावचे माजी सरपंच आनंदराव धोंडीराम पाटील यांचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक गजानन पाटील यांचे ते बंधू असल्याने व राजकीय क्षेत्रातही कार्यरत असल्याने खळबळ उडाली होती.भिलवडी पोलिसासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक याचा तपास करत होते. तपासाअंती हा खून पूर्ववैमनस्यातून रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्तात्रय जाधव व त्याच्या साथीदाराने सुपारी घेऊन केल्याचे निष्पन्न झाले.

खटाव येथील लक्ष्मण मडिवाल व आनंदराव पाटील यांच्यात राजकीय कारणावरून वाद होता, तर अरविंद पाटील याची शेतजमीन आनंदराव पाटील यांनी विकत घेतल्याचाही त्यास राग होता. यातून दोघांनी मिळून दत्तात्रय जाधवला १० लाखांची सुपारी देवून हा खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. यावरून चौघांना अटक केली आहे.पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सुनील हारूगडे, प्रवीण शिंदे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालयSangliसांगली