भिलवडी
: ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील कमल जिनगोंडा पाटील हिला महालिंगपूर (कर्नाटक) येथे भिलवडी पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून चाळीस हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत.
याबाबत भिलवडी पोलिसांत सविता महादेव कोळी (रा. ब्रम्हनाळ) यांनी फिर्याद दिली होती.
दहा हजारांची बोरमाळ, पंधरा हजार किमतीची गुंफलेली माळ, दोन हजार रुपयाचे मंगळसूत्र, बारा हजार रुपये किमतीची सुवर्ण फुले अशी असे ३९ हजार रुपयाचे दागिने लंपास केले होते. कमल पाटीलकडून चोरी केलेले हे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक विशाल जगताप व सायबरतज्ञ कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस हवालदार माणिक मोरे करत आहेत.