वाळवा : येथील माजी सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी तुकाराम माने ऊर्फ एस. टी. माने (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते वाळवा गावचे ५ वर्षे सरपंच हाेते. पंचायत समिती सदस्य म्हणून ५ वर्ष आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून ११ वर्ष ते कार्यरत होते. सरपंच असताना त्यांनी वाळव्यासाठी पाणीपुरवठा योजना आणली. गावातील एसटीची सुविधा त्यांनी सुरू केली. सर्वसामान्यांना रेशन कार्ड, दाखले, विविध शासकीय योजना तळागाळात नेण्यात ते आग्रही होते. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत हाेते. त्यांच्या निधनाने सार्वजनिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.
जिल्हा परिषदचे माजी सदस्य शिवाजीराव माने यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST