शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांचे लक्ष न्यायालयीन निर्णयाकडे

By admin | Updated: October 12, 2015 00:39 IST

जिल्हा बँक घोटाळा : आज सुनावणी

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी, १२ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी निकाल अपेक्षित असल्यामुळे, माजी संचालकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी शंभरजणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयीन सुनावणीमुळे त्यांनी गत आठवड्यात सुनावणीचे कामकाज १६ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या माजी संचालकांचे लक्ष गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागले होते. न्यायालयाने पुन्हा १२ आॅक्टोबर ही तारीख दिली आहे. जवळचीच तारीख मिळाल्याने संचालकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी, सोमवारी होणाऱ्या सुनावणीला त्यांना निर्णयाची अपेक्षा आहे. जिल्हा बँकेच्या या घोटाळा प्रकरणात माजी संचालक, तत्कालीन अधिकारी, मृत संचालकांचे वारसदार अशा शंभरजणांचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या सुनावणीवेळी तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापक अशा सातजणांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. नऊजण सुनावणीला गैरहजर राहिले. ८४ लोकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यावर सुनावणी होणार असल्याने सुनावणीनंतरची तारीख म्हणणे मांडण्यासाठी मिळावी, अशी मागणी यातील बहुतांश माजी संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार चौकशी अधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. चौकशी अधिकाऱ्यांची सुनावणी ६ आॅक्टोबरला असल्याने त्यापूर्वी न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घ्यावा, अशी विनंती माजी संचालकांनी केली होती. याचिकेवरील निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी सूचना न्यायालयाने केली होती. न्यायालयीन आदेशाबाबत चौकशी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असेही सांगितले. त्यामुळे आरोपपत्रासंदर्भातील सुनावणीही १६ आॅक्टोबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांना काहीच करता येणार नसल्याने, न्यायालयामार्फत याचिकेवर पुढील सुनावणीस निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)चौकशी १६ रोजी...चौकशी अधिकाऱ्यांचीही चौकशी न्यायालयीन निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे १६ आॅक्टोबर रोजी त्यांनी सुनावणीची तारीख दिली आहे. याप्रकरणात जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या दिग्गज राजकीय नेत्यांची नावे असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. माजी अधिकाऱ्यांचीही नावे या प्रकरणात आहेत.