शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वनविभागाच्या भरती परीक्षेत सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी कॉपी, छत्रपती संभाजीनगरातील चौघांवर गुन्हा दाखल

By शरद जाधव | Updated: August 10, 2023 17:32 IST

मदत करण्याच्या मोबदल्यात दहा लाख रूपयांचा व्यवहार

सांगली : वनविभागाच्या वनरक्षक भरती परीक्षेत सलग दुसऱ्या दिवशी गैरप्रकार झाला. मंगळवारी डमी विद्यार्थी सापडला असतानाच, बुधवारी पुन्हा डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला. याप्रकरणी गैरप्रकार करणारा उमेश संजय हुसे (रा. आडगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर), साहित्य पुरवठा करणारा बालाजी नामदेव तोगे (रा. खोडेगाव,ता. जि. छत्रपती संभाजीनगर), एजंट राजु नांगरे आणि अजय नांगरे (दोघेही रा. काद्राबाद ता, जि. छत्रपती संभाजीनगर) अशा चौघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या वनविभागाच्या वनरक्षक भरती परीक्षेत गेल्या आठवड्यात डिव्हाईसव्दारेच कॉपीचा प्रयत्न झाला होता. मिरज रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्चमध्ये ही परीक्षा होत आहे. दुपारी पेपर सुरु होण्यापुर्वी केलेल्या तपासणीत उमेश हुसे याच्या हालचालीबाबत परीक्षा नियंत्रकांना संशय आला.

यानंतर तपासणीत त्याच्या अंतरवस्त्रामध्ये एका कम्युनिकेशन डिव्हाईस, मायक्रोफोन मिळून आला. हे साहित्य कॉपीसाठी बालाजी तोगे याने दिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत एजंट राजु नांगरे आणि अजय नांगरे यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर सर्वांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा लाखांचा सौदा...वनरक्षक भरती परीक्षेत मदत करण्यासाठी राजु नांगरे व अजय नांगरे, बालाजी तोगे यांचे संगनमत होते. यात मदत करण्याच्या मोबदल्यात दहा लाख रूपयांचा व्यवहार झाला होता. परीक्षा झाल्यानंतर हे पैसे दिले जाणार होते. त्याअगोदरच संशयित पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर कनेक्शनवनविभाग भरती परीक्षेत गैरप्रकाराचा गेल्या सहा दिवसातील तिसरा प्रकार आहे. यातील सर्व संशयित हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. गेल्या आठवड्यात अविनाश संजनसिंग गुमलाडू (रा. शिवगाव ता. वैजापूर) आणि अर्जून रतन नार्डे (रा. संजरपूरवाडी ता. वैजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर मंगळवारी प्रदीप कल्याणसिंग बैनाडे (रा. बेंद्रेवाडी), राहुल सुखलाल राठोड ( रा. हरसील) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी कारवाई झालेले सर्व संशयितही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागexamपरीक्षा