शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनामुळे परदेशी, देशांतर्गत सहली रद्द, अनेक व्यावसायिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:15 IST

कोरोना व्हायरसच्या दहशतीने परदेशी आणि देशांतर्गत सहलींची जवळपास ९0 टक्के आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. गेल्या कित्येक वर्षात हवाई वाहतूक, ट्रॅव्हल्स्च्या तिकीटदरात घसरण होऊनही प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना फटका बसला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे परदेशी, देशांतर्गत सहली रद्दजिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना फटका

अविनाश कोळी सांगली : कोरोना व्हायरसच्या दहशतीने परदेशी आणि देशांतर्गत सहलींची जवळपास ९0 टक्के आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. गेल्या कित्येक वर्षात हवाई वाहतूक, ट्रॅव्हल्स्च्या तिकीटदरात घसरण होऊनही प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना फटका बसला आहे.देशात, राज्यात साखळी पद्धतीने काम करणाऱ्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स एजन्सीज्ची संख्या सांगली जिल्ह्यात विस्तारली आहे. गेल्या आठ वर्षात परदेशी सहलींचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात शंभरहून अधिक एजन्सीज् कार्यरत आहेत. याशिवाय वैयक्तिक सहली आरक्षित करण्याचे प्रमाणही वाढले आहे.

या सर्व एजन्सीज्ना आणि सहलीचे नियोजन करणाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव जगभरात होत असल्याने अनेक ठिकाणी विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे नियोजित सहली रद्द झाल्या आहेत. प्रवाशांकडूनच सहली रद्द करण्याचे प्रमाण गेल्या महिन्याभरात वाढल्याचा अनुभव ट्रॅव्हल एजंटांना येत आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत विदेशी सहलींचे प्रमाण ९0 टक्क्यांपर्यंत घटले आहे.देशांतर्गत सहलींनाही याचा फटका बसला आहे. बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद, हिमाचल प्रदेश-मनाली, उटी, जम्मू, राजस्थान, काश्मीर येथे दरवर्षी सांगली जिल्ह्यातून पर्यटक जात असतात, पण देशातही कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने या सहलीही रद्द होत आहेत. देशांतर्गत सहली रद्द होण्याचे प्रमाण ७0 टक्क्यांवर आहे. आता पुण्यात संशयित आढळले असल्याने देशांतर्गत पर्यटनालाही मोठा ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाtourismपर्यटनSangliसांगली