मिरज : मिरजेत शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या वाढदिवस अन्नदान वाटप व आरोग्य शिबिरासह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
आनंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत शिवसेनेतर्फे गरजूंना मदत करण्यात आली. महापालिकेच्या आस्था महिला बेघर निवारा केंद्रात अन्नदान वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी महिला बेघर महिला निवारा केंद्राचे शाहीन शेख, मिरज शहर शिवसेनाप्रमुख चंद्रकांत मंगुरे, विजय शिंदे, किरण रजपूत, मतीन काझी उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन मिरज शहर शिवसेनाप्रमुख विजय शिंदे यांनी केले होते. यावेळी संदीप पाटील, महेश दोडमनी, सचिन कोरे, गजानन मोरे, प्रकाश जाधव, आकाश चव्हाण, संदीप दिंडे, रोहित चौगुले, रियाज शेख, फिरोज उगारे, योगेश आवळे, प्रकाश अथणीकर उपस्थित होते.