शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्यांची डेडलाईन वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:45 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्याच्या पूर्व भागात निर्माण झालेली तीव्र दुष्काळी परिस्थिती अद्यापही कायम आहे. ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्याच्या पूर्व भागात निर्माण झालेली तीव्र दुष्काळी परिस्थिती अद्यापही कायम आहे. मान्सूनचा पाऊसच या भागात न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ६७ ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या असून, शासन निर्णयानुसार त्यांना १ आॅगस्टची मुदत असणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीरच असल्याने चारा छावण्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शासनाने जानेवारीपासूनच आठ प्रकारच्या सवलती या भागात सुरू केल्या आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात एकही टॅँकर सुरू नव्हता. अशी स्थिती असताना आता पिण्याच्या पाण्यासाठीच्या टॅँकरची संख्या अडीचशेवर गेली आहे. एप्रिल महिन्यात जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण झाल्याने चारा छावण्यांची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात कमी चारा छावण्या सुरू झाल्या असल्या तरी नंतर काही जाचक अटी रद्द केल्याने चारा छावण्यांची संख्या वाढलेली आहे.जिल्ह्यात ६८ ठिकाणी चारा छावण्या होत्या. त्यातील डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील चारा छावणी बंद करण्यात आल्याने सध्या ६७ चारा छावण्या सुरू आहेत. ज्यामध्ये ४४ हजार ९५० जनावरे दाखल आहेत. बार कोड टॅगिंग व कॅटल कॅम्प मॅनेजमेंट अ‍ॅपवर जनावरांची ९९.९२ टक्के नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३० चारा छावण्या जत तालुक्यात सुरू आहेत.राज्य शासनाच्या ६ जुलैच्या निर्णयानुसार दुष्काळी जाहीर केलेल्या भागात सुरू असलेल्या चारा छावण्या १ आॅगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चारा छावण्या सुरू असलेल्या भागात गेल्या पंधरा दिवसांत झालेला पाऊस व चाºयाची उपलब्धता लक्षात घेऊन टप्प्या-टप्प्याने चारा छावण्या बंद करण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. यापूर्वीच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंतच छावण्या सुरू ठेवण्याचे आदेश होते.येत्या पंधरवड्यात चारा छावण्या बंद होणार असल्या तरी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, ती जैसे थे आहे. मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, तासगाव भागात मान्सूनचे आगमनच झाले नसल्याने चाºयाची उपलब्धता झालेली नाही. विशेषत: ज्या भागात म्हैसाळ, टेंभू योजनेतून पाणी पोहोचले नाही, त्या भागातील टंचाई परिस्थिती अधिक गंभीर असल्याने १ आॅगस्टला चारा छावण्या बंद झाल्यास जनावरांचे हाल होणार आहेत.तालुकानिहाय चारा छावण्याव जनावरांची संख्यातालुका छावण्या जनावरेआटपाडी २७ १९६३३जत ३० १८०९१कवठेमहांकाळ ८ ६००८खानापूर १ ३५४कडेगाव १ २४६एकूण ६७ ४४४९५