शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

चारा छावण्या प्रस्तावांची तासगाव तालुक्यात वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:47 IST

तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण जाहीर केले असले तरी

ठळक मुद्देजनावरांची उपासमार : सव्वादोन लाख पशुधनाची होतेय परवड

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण जाहीर केले असले तरी, जुन्या अनुभवामुळे, नव्याने चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्था पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे चारा छावण्यांचे धोरणच घातक ठरले असून जनावरांची उपासमार होत आहे.

गेल्यावर्षीचा अपुरा पाऊस, वाया गेलेला रब्बी हंगाम आणि जोडीला पाचवीला पूजलेली पाणीटंचाई यामुळे तासगाव तालुक्यात ओल्या आणि सुक्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. चाºयाअभावी जनावरांची उपासमार सुरू झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. चाराटंचाईची परिस्थिती या पुढेही अशीच राहिली, तर जनावरे कसायाला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. यावर मात करण्यासाठी तातडीने चारा डेपो किंंवा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.

२०१२ च्या पशुगणनेनुसार तालुक्यात सुमारे २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. यामध्ये लहान जनावरे, मोठी जनावरे, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुटचा समावेश आहे. तालुक्यातील सुका चारा संपलेला आहे. पाणीटंचाईमुळे ओला चारा तयार होत नाही. जनावरांना एकवेळच्या चाºयासाठी शेतकºयांना धावाधाव करावी लागत आहे. दुष्काळाने शेतकरी भिकेकंगाल झाला आहे. जनावरांसाठी ओला चारा उपलब्ध नाही, तर सुका चारा संपला आहे.

शासनाने मागणी येईल तिथे चारा छावणी देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरु करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे आवाहनदेखील करण्यात आले. मात्र यापूर्वी छावण्या चालविलेल्या अनेक संस्थांवर अनियमिततेचा ठपका ठेवून गुन्हे दाखल झाले आहेत. या जुन्या अनुभवामुळे नव्याने छावण्या सुरू करण्यास संस्था पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे शासनाची मंजुरी, पशुपालक शेतकºयांची मागणी असूनदेखील छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तालुक्यात दोन दिवसांपूर्वी डोंगरसोनी येथे एका विकास सोसायटीने पुढाकार घेऊन छावणी सुरू केली आहे. मात्र याव्यतिरिक्त एकही प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला नाही. त्यामुळे जनावरांची उपासमार आणि चारा छावण्यांचे धोरणच निरूपयोगी, अशीच काहीशी अवस्था झाली आहे.छावणी नको : डेपो द्याचारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाची प्रक्रिया किचकट आहे. चारा छावण्या चालवणेदेखील जिकिरीचे काम आहे. त्यामुळे बहुतांश संस्थांनी प्रशासनाच्या आवाहनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे चारा छावण्यांऐवजी तातडीने चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील पशुधनगाय ३२२८१म्हैस ६५३३३शेळी ३०४६०मेंढी ९२७६कुक्कुट १०१४९६एकूण २३८८४६

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना