शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य माणूस साहित्याचा केंद्रबिंदू हवा - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: January 28, 2017 21:16 IST

भूमिका कोणतीही असली तरी, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीपाल सबनीस यांनी केले.

 
चरण (सांगली), दि. २८ -  वेगवेगळ्या प्रकारचे जातीसमूह या देशात आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेतून चळवळी सुरू आहेत. भूमिका कोणतीही असली तरी, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय 
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी केले. पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाच्यावतीने आयोजित नवव्या डोंगरी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सबनीस म्हणाले की, अनेक प्रकारची संमेलने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात होत आहेत. अशा क्षेत्रीय संमेलनांचा इतिहास लिहिण्याची गरज आहे. साहित्यिकांनी दलित, आदिवासी, डोंगरी अशा संमेलनांमधून समतेचा विचार प्रस्थापित केला पाहिजे. याचबरोबर आपल्या महापुरुषांना जातीय चौकटीत न मांडता अखिल मानवजातीच्या पातळीवर त्यांचे विचार पोहोचविले पाहिजेत. संमेलनाचे उद्घाटक माजी मंत्री आमदार जयंत पाटील म्हणाले की, साहित्यच माणसाला सुसंस्कृत बनविते. साहित्याच्या क्षेत्रातील माणसे आपल्या प्रतिभेने जगाच्या कानाकोपºयात पोहोचतात. साहित्यातून माणसाला विचार मिळतो, म्हणून साहित्यिकांना व साहित्य चळवळीला प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. समाज सर्वार्थाने पुढे न्यायचा असेल, तर साहित्यिकांची नितांत गरज आहे. यावेळी साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेस पन्नास हजार रुपये देणगी
देण्याचे पाटील यांनी जाहीर केले. माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, कवी प्रदीप पाटील यांनी मनोगत  व्यक्त केले. हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले. शब्दरंग साहित्य मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले.
संमेलनास प्रा. शामराव पाटील, प्रा. डॉ. डी. जी. कणसे, पी. वाय. पाटील, सरपंच विजय विभुते, उपसरपंच अंकुश पाटील, मुख्याध्यापक अमृतकुमार पांढरे, शिवाजी पाटील, डी. वाय. ढेरे, मोहन पाटील, बाजीराव शेंडगे, मनोज चिंचोलकर, तानाजी पाटील उपस्थित होते. नारायण घोडे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)