यामध्ये महेश दत्तात्रय दानोळे (वय २०), सागर बाबासाहेब कदम (वय २४), सुनील हाजाप्पा कालेकर (वय २२), अनिकेत उदय चव्हाण (वय २२, तिघे रा. वरचे गल्ली, तासगाव), विक्रांत हरी कांबळे (वय २५, रा. कांबळेवाडी, तासगाव) यांना अटक करण्यात आली आहे, तर ऋतिक शीतल शिंदे हा अद्याप फरार आहे.
लवेशला भोसकल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेने तासगाव शहरात खळबळ उडाली. गेल्या काही महिन्यांपासून दोन गटांत सुरू असलेल्या वादातून हे कृत्य झाले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला आरोपी अंकलीमार्गे कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
चौकट
दोन गटांतील वाद
मयत धोत्रे आणि आरोपी शिंदे यांच्या दोन गटांत काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होता. १४ मार्च रोजी दोन्ही गटांत भांडण झाले होते. यावेळी परस्परविरोधी १९ जणांविरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. हाच वाद मिटविण्यासाठी शुक्रवारी धोत्रेला बोलावून घेऊन त्याचा खून करण्यात आला.