शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीस स्थगिती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:06 IST

मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी ही पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क करुन तातडीने भरतीची

ठळक मुद्देमत्स्य व दुग्धविकास मंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याप्रकरणी अधिकाऱ्यांची कान उघडणी

सांगली : मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी ही पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क करुन तातडीने भरतीची प्रक्रिया बंद करुन, नव्याने मरीन बायॉलॉजी पात्रतेचा समावेश करुन जाहिरात प्रसिध्द करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत, असे आश्वासन मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तरुणांना दिले.

 

‘लोकमत’ने दि. १६ जानेवारी २०१९ रोजी ‘मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्'ातील तरुणांनी प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जानकर यांची रविवारी कºहाड येथे भेट घेतली. यावेळी जानकर यांनी भरतीतील बदल करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या ९० जागा भरणार असल्याचे जाहीर करुन तशी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानंतर ‘क’ वर्गातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पद भरतीच्या ७९ जागा जाहीर केल्या आहेत. उर्वरित ‘अ’ व ‘ब’ वर्गाच्या ११ जागांची भरती जाहीर केली नाही. सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदासाठी बी.एफ्.एस्सी. ही पदवी पात्र ठरविली आहे. वास्तविक महाराष्टÑात मत्स्यव्यवसाय विभागात १९८९-९० पासून एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) पात्रताधारक उमेदवारांची भरती झाली आहे. आजही असे अधिकारी मत्स्यव्यवसाय विभागात सेवेत आहेत. असे असताना केवळ बी.एफ.एस्सी. ही पात्रता ठरविल्याने मत्स्य विभागात गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरणाºया एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) उमेदवारांवर शासनाने अन्याय केला असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप आहे. मत्स्यव्यवसाय विभागात ‘ब’ व ‘क’ वर्गातील ७९ जागा जाहीर केल्या आहेत. ज्या ७९ जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी व उर्वरित ११ जागांसाठीही एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) ही शैक्षणिक पात्रता ग्रा' धरून सुधारित ९० जागांची फेरजाहिरात द्यावी व अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मरीन बायॉलॉजी पात्रतेच्या उमेदवारांनी मंत्री जानकर यांच्याकडे केली.

यावेळी जानकर यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून, मत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीमधील जाहिरातीत त्रुटी असल्याच्या तरुणांच्या तक्रारी असून, या तक्रारींची सत्यता पडताळून भरतीला स्थगिती देऊन सुधारित जाहिरात काढण्याची सूचनाही अधिकाºयांना दिली आहे, अशी माहिती प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे यांनी दिली.

 मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांवर अन्याय झाल्याचे निवेदन मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे व अन्य उमेदवारांनी दिले.

 

 

 

टॅग्स :Sangliसांगलीfishermanमच्छीमार