शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीस स्थगिती देणार, जानकर यांनी दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:55 IST

मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तातडीने भरतीची प्रक्रिया बंद करुन नव्याने मरीन बायॉलॉजी पात्रतेचा समावेश करुन जाहिरात प्रसिध्द करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे आश्वासन मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तरुणांना दिले.

ठळक मुद्देमत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीस स्थगिती देणारमत्स्य व दुग्धविकासमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

सांगली : मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तातडीने भरतीची प्रक्रिया बंद करुन नव्याने मरीन बायॉलॉजी पात्रतेचा समावेश करुन जाहिरात प्रसिध्द करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे आश्वासन मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तरुणांना दिले.लोकमतने दि. १६ जानेवारी २०१९ रोजी मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळली या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जानकर यांची कऱ्हाड येथे भेट घेतली. यावेळी जानकर यांनी शिष्टमंडळाला भरतीतील बदल करण्याचे आश्वासन दिले.मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या ९० जागा भरणार असल्याचे जाहीर करुन तशी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानंतर क वर्गातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पद भरतीच्या ७९ जागा जाहीर केल्या आहेत. उर्वरित अ व ब वर्गाच्या ११ जागांची भरती जाहीर केली नाही. सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदासाठी बी.एफ्.एस्सी. ही पदवी पात्र ठरविली आहे.

वास्तविक महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय विभागात १९८९-९० पासून एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) पात्रताधारक उमेदवारांची भरती झाली आहे. आजही असे अधिकारी मत्स्यव्यवसाय विभागात सेवेत आहेत. असे असताना केवळ बी.एफ.एस्सी. ही पात्रता ठरविल्याने मत्स्यविभागात गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरणाऱ्या एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) उमेदवारांवर शासनाने अन्याय केला असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप आहे.

मत्स्यव्यवसाय विभागात ब व क वर्गातील ७९ जागा जाहीर केल्या आहेत. ज्या ७९ जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी व उर्वरित ११ जागांसाठीही एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) ही शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरून सुधारित ९० जागांची फेरजाहिरात द्यावी व अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मरीन बायॉलॉजी पात्रतेच्या उमेदवारांनी मंत्री जानकर यांच्याकडे केली.यावेळी जानकर यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीमधील जाहिरातीमध्ये त्रुटी असल्याचे तरुणांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची सत्यता पडताळून भरतीला स्थगिती देवून सुधारीत जाहिरात काढण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे यांनी दिली.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरSangliसांगली