दिघंची-हेरवाड जिल्ह्यातील पहिला टोलमुक्त रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:49+5:302021-04-11T04:24:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दिघंची ते हेरवाड या जिल्ह्यातील पहिल्या टोलमुक्त बीओटी रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुुरू आहे. ...

The first toll free road in Dighanchi-Herwad district | दिघंची-हेरवाड जिल्ह्यातील पहिला टोलमुक्त रस्ता

दिघंची-हेरवाड जिल्ह्यातील पहिला टोलमुक्त रस्ता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दिघंची ते हेरवाड या जिल्ह्यातील पहिल्या टोलमुक्त बीओटी रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुुरू आहे. दिघंची ते सलगरेपर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात घाटमाथ्यावरही रस्त्याच्या कामाने गती घेतली आहे. शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेतून रस्त्यासाठी ४६१ कोटी ६१ लाख रुपये मंजूर आहेत. या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासन ६० टक्के तर ठेकेदार ४० टक्के रक्कम खर्च करणार आहेत. ठेकेदारास व्याजासह बारा वर्षात राज्य शासन पैसे परत देणार आहे.

दिघंची ते हेरवाड १३५.२५ किलोमीटरचा हा रस्ता आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ, मिरज, शिरोळ तालुक्‍यातून कर्नाटकात हेरवाडला जोडला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यामुळे राज्यमार्गाचा दर्जा मिळाला आहे. तो आता ‘राज्यमार्ग क्रमांक १५३’ म्हणून ओळखला जात आहे. दिघंची ते हेरवाड रस्त्याचे कामाच्या सोयीसाठी दोन भाग केले आहेत. पहिला टप्पा दिघंची ते सलगरे असून, येथील काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. दुसरा टप्पा सलगरे ते हेरवाडपर्यंत असून, तेथील रस्त्याचे काम ५० टक्के पूर्ण आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२१ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांनी सांगितले.

चौकट

हायब्रीड ॲन्युटी योजना

राज्य शासनाने राज्य मार्ग विकासांसाठी हायब्रीड ॲन्युटी योजना सुरू केली आहे. त्यात राज्य मार्गाच्या प्रस्तावित खर्चाच्या ६० टक्के रक्कम राज्य शासन खर्च करेल, उर्वरित ४० टक्के रक्कम ठेकेदाराने खर्च करायची आहे. ती टोलमधून वसूल केली जाणार नाही. राज्य शासन या रकमेचा परतावा काम पूर्ण झाल्यानंतर १२ वर्षांत समान हप्त्यात देईल. त्यावर व्याजही दिले जाईल. बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्त्वावर मात्र टोलशिवायचा रस्ता असेल.

चौकट

असा जातो राज्यमार्ग

दिघंची, आटपाडी, शेटफळे (ता. आटपाडी), कोळे, पाचेगाव (ता. सांगोला), घाटनांद्रे, तिसंगी, कुंडलापूर, कुची, कवठेमहांकाळ, हिंगणगाव, कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ), सलगरे, बेळंकी, शिपूर, एरंडोली, टाकळी, मिरज (ता. मिरज), शिरोळ, कुरुंदवाडमार्गे हेरवाड (कर्नाटक).

Web Title: The first toll free road in Dighanchi-Herwad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.