शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

कसबे डिग्रजची ‘कृष्णा’ प्रथम

By admin | Updated: September 22, 2015 00:10 IST

होड्यांच्या शर्यती : कवठेपिरानची सप्तर्षी दुसऱ्या स्थानी; सांगलीत गर्दी

सांगली : शिट्ट्या, टाळ्या आणि प्रेक्षकांच्या उस्फूर्त साक्षीने सोमवारी कृष्णा नदीपात्रात चुरशीने होड्या धावल्या. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा होडीने सहा किलोमीटरचे अंतर ४१ मिनीटात पार करून प्रथम क्रमांक पटकावला. कवठेपिरानच्या सप्तर्षी होडीला मात्र दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शिवकल्प ग्रुप आणि सांगली जिल्हा रोर्इंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कृष्णा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या. सांगलीवाडी येथील शंकर घाटावरून स्पर्धेस प्रारंभ झाला. उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आ. सुधीर गाडगीळ व माजी आमदार दिनकर पाटील यांच्याहस्ते निशाण दाखवून झाले. महाराष्ट्र कनोर्इंग कयार्इंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रताप जामदार यांनी स्वागत केले. शिवकल्प ग्रुपचे अध्यक्ष योगेश पाटील व उपाध्यक्ष अमित पाटील यांनी संयोजन केले. यावेळी उद्योजक मिलींद पाटील, भरत देशमुख, विजय पाटील, समित कदम, सुनील पाटील, उदय पाटील, उमेश पाटील, विष्णू पाटील, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी आयर्विन पुलावर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. आंतरराष्ट्रीय नौकायन प्रशिक्षक दत्ता पाटील, दीपक पाटील, भरत बर्गे, अमोल बोळाज, वैभव पाटील, अभिनंदन पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्या एक ते तीन क्रमांकांना अनुक्रमे सात, पाच व तीन हजाराचे रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेचा अंतिम निकाल असा : कृष्णा बोट क्लब, कसबे डिग्रज (प्रथम), सप्तर्षी बोट क्लब, कवठेपिरान (द्वितीय), समडोळी बोट क्लब, समडोळी (तृतीय).