लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्र या ठिकाणी १३ कोरोना पेशंट विलगीकरण केंद्रात आहेत. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या पहिल्या रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्याने निरोप देण्यात आला.
आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे व माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्या हस्ते रोप देऊन पहिल्या रुग्णाचा सत्कार केला. यावेळी आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश आडमुठे, डॉ. प्रवीण कोळी, आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे, पाणीपुरवठा अधिकारी सचिन मोरे, ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य परिचारिका सुलताना जमादार, अर्चना पाटील, इंद्रजित हिरुगडे, आशिष कांबळे, सागर जगताप, दत्तराज हिप्परकर उपस्थित होते.
वैभव शिंदे म्हणाले, आष्टा नगरपरिषद ग्रामीण रुग्णालय आष्टा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या सहकायार्मुळे विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रातील रुग्णावर उपचार सुरू आहेत. हे केंद्र नागरिकांना वरदान ठरले आहे.