सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने ३४६७ लाभार्थ्यांना घरांसाठी अनुदान मंजूर केले आहे. त्यातील २५३२ लाभार्थ्यांना १५ हजारांचा पहिला हप्ता नुकताच वर्ग करण्यात आला. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ही माहिती दिली.
याअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला पंधरा हजारनुसार जिल्हाभरात एकूण ३ कोटी ७९ लाख ८० हजार रुपये देण्यात आले आहेत. तालुकानिहाय निधी मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या अशी : आटपाडी १७६ (२६ लाख ४० हजार), जत २०३३ (३ कोटी ४ लाख ९५ हजार), तासगाव ५६ (८ लाख ४० हजार), मिरज ९४ (१४ लाख १० हजार), कवठेमहांकाळ ९० (१३ लाख ५० हजार), शिराळा ३३ (४ लाख ९५ हजार), वाळवा २९ (४ लाख ३५ हजार), पलूस ३ (४५ हजार), कडेगाव १५ (२ लाख २५ हजार), खानापूर ३ ( ४५ हजार).
कोरे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ८ हजार ७१८ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यातील ३ हजार ४६७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पैकी २ हजार ५३२ जणांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला. घराची कामे होतील त्यानुसार पुढील निधी दिला जाईल.