शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत स्टेट बँकेला आग

By admin | Updated: July 18, 2014 23:57 IST

कागदपत्रे जळाली : दीड लाखाचे नुकसान

सांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील स्टेट बँकेला आग लागली. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे फर्निचर, पंखे, कपाटे, खुर्च्या जळून खाक झाल्याने एक लाख ६३ हजाराचे नुकसान झाले आहे. आज (शुक्रवार) पहाटे तीन ते चार या दरम्यान ही घटना घडली. घटनेची रात्री उशिरा शहर पोलिसांत नोंद झाली. स्टेट बँकेचे दुमजली कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर बँकेचे दैनंदिन व्यवहार चालतात. दुसऱ्या मजल्यावर महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. बँकेजवळ एटीएम सेवा आहे. पहाटे तीन वाजता दुसऱ्या मजल्यावरुन धुराचे लोट येत असल्याचे एटीएममधील रखवालदाराच्या निदर्शनास आले. त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील लोक जमा झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली. एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे, फायली, संगणक, फॅक्स मशीन, दूरध्वनी, टेबल, खुर्चा, कपाटे जळून खाक होऊन एक लाख ६३ हजाराचे नुकसान झाले आहे. बँकेच्या व्यवस्थापिका आशा मोहन सोनवणे (रा. नेमीनाथनगर, सांगली) याही आगीचे वृत्त समजताच दाखल झाल्या होत्या. त्यांनी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आगीमध्ये काय नुकसान झाले आहे, याची माहिती घेतली. त्याची यादी तयार केली. शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी) बँकेत आग कशाने लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनाही आगीचे कारण समजू शकले नाही. एटीएममधील रखवालदाराच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार तातडीने उघडकीस आला. अन्यथा बँकेच्या पहिल्या मजल्यापर्यंत आग वाढली असती.