शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम हटविताना दंडही वसूल होणार, सांगली आयुक्तांचा इशारा 

By अविनाश कोळी | Updated: May 21, 2024 19:20 IST

पूरपट्ट्यातील अतिक्रमणांवर चालणार जेसीबी

सांगली : महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ड्रोनच्या नजरेतून एकही बांधकाम सुटणार नाही. त्यामुळे जी बांधकामे अनधिकृत व विनापरवाना उभारली असतील ती हटविण्याबरोबरच त्यांचा मालमत्ता करही दंडासह वसूल केला जाणार आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांनी याबाबतची धोरण राबविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाले, ओत व पूरपट्ट्यात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी महापालिकेचा परवाना न घेता बांधकामे केली आहेत तर काही ठिकाणी महापालिकेच्या चुकीच्या परवान्याच्या आधारे बांधकामे झाली आहेत. अशा बांधकामांच्या नोंदी महापालिकेकडे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामे कोणत्याही परिस्थितीत हटविण्यात येतील, मात्र त्यांच्याकडून कर व दंड वसूल केला जाईल, असे आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

चुकीच्या परवान्यांची चौकशी होणारयापूर्वी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवाने किंवा रेखांकने मंजूर केली असतील तर अशा परवान्यांचीही चौकशी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

सांगली, मिरज, कुपवाडमध्ये सर्वात कमी कर

राज्यातील अन्य ड वर्ग महापालिकांच्या तुलनेत सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरातील मालमत्ता कर कमी आहे. प्रति चौरस मीटर १० रुपयांनी करआकारणी कमी होते. त्यामुळे सांगलीत करआकारणी अधिक असल्याची चर्चा अत्यंत चुकीची आहे, असे आयुक्त म्हणाले.

व्यावसाय परवान्यांबाबत कडक पावलेकॅफेचालकांसह सर्व दुकानांच्या व्यावसाय परवान्यांबाबत महापालिकेने कडक धोरण स्वीकारले आहे. सध्या तपासणीचे काम सुरू आहे. विनापरवाना व्यावसाय करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच प्रसंगी दुकान सील करण्याची कारवाई केली जाईल.

ज्या गोष्टीसाठी कर त्या सुविधा मिळणारमहापालिका ज्या सुविधांसाठी कर आकारणी करते त्या सर्व सुविधा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. सेवा न देता करआकारणीच्या तक्रारी होतात, त्या आम्ही दूर करू, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sangliसांगली