शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर

By admin | Updated: January 12, 2016 00:41 IST

जिल्हा परिषद : राजीनामा नाट्यावर पडदा : १५ जानेवारीला सत्ताधारी गटाची बैठक

सांगली : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबतच्या तर्कवितर्कांना सोमवारी पूर्णविराम देत पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले. सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्याकडे सभापतींनी आपले राजीनामे दिले. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, आरोग्य सभापती गजानन कोठावळे, महिला बालकल्याण सभापती पपाली कचरे यांनी यापूर्वीच आपले राजीनामे सादर केले आहेत. सभापती मनीषा पाटील आणि उज्ज्वला लांडगे यांनी राजीनामे दिल्याने, आता नूतन पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि आगामी रणनीती ठरविण्यासाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटाची बैठक शुक्रवार, दि. १५ जानेवारीला बोलाविण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली. जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापतींना पक्षाने ठरवून दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल २० डिसेंबरला पूर्ण झाल्याने उर्वरित सव्वा वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवडी होणार आहेत. त्यानुसार सत्ताधारी गटाने विद्यमान पदाधिकाऱ्यांना राजीनामे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, महिला व बालकल्याण सभापती पपाली कचरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्याकडे आपले राजीनामे दिले होते. समाजकल्याण सभापती उज्ज्वला लांडगे यांचाही राजीनामा अध्यक्षांकडे आला होता. मात्र, सभापती मनीषा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे वृत्त होते. पाटील यांच्या राजीनामा न देण्याच्या पवित्र्यामुळे सत्ताधारी गटात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि तानाजी पाटील यांच्यातील चर्चेनंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार पाटील यांनी राजीनामा दिला. सोमवारी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर तो अध्यक्षांकडे सादर करण्यात आला. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून सुरू असलेल्या चर्चेलाही यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सत्ताधारी गटातील सदस्यांची बैठक बोलाविली असून, यात सदस्यांची मते अजमावून राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ. जयंत पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने आता इच्छुक सदस्यांनी प्रयत्न चालविले आहेत. (प्रतिनिधी)सत्ताधारी गटाची बैठक : निर्णयाकडे सर्वांचे लक्षजिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केल्यानंतर राजीनाम्याबाबत चर्चा करण्यासाठी व नूतन पदाधिकारी निवडीबाबत सदस्यांची मते अजमावून पाहण्यासाठी शुक्रवार, दि. १५ जानेवारीला सत्ताधारी गटाची बैठक बोलाविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’पदाधिकारी निवडीत पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने पदाधिकाऱ्यांचे राजीनामानाट्य चांगलेच रंगले होते. मात्र, सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याने इच्छुकांचा जीव खऱ्याअर्थाने भांड्यात पडला असून, आता इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटातील बदललेल्या समीकरणामुळे नूतन पदाधिकारी निवडी करत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसला बरोबर घेणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.